maharashtra day, workers day, shivshahi news,

हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाह निर्मूलन जनजागृतीची प्रतिज्ञा

बालविवाह निर्मूलन जनजागृतीची प्रतिज्ञा

Child Marriage Eradication Awareness Pledge ,Martyr Bahirji Memorial School ,  Hingoli , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली चंद्रकांत वैद्य
05 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी माया सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार हुतात्मा बर्हिजी स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश इंगळे यांच्या सहकार्याने शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना बालविवाह अधिनियम 2006 बाबत माहिती व्हावी या उद्देशाने मौजे गिरगांव ता.वसमत जि. हिंगोली येथे बाल विवाह निर्मुलन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्याथ्यांनी बाल विवाह निर्मूलन पथनाट्य सादर केले. बाल विवाह म्हणजे काय, विवाहाचे योग्य वय, बाल विवाह होण्याचे अनेक कारणे आहेत जसे की, कुटुंबाचे स्थलांतर, आर्थिक परिस्थिती, कुटुंबातील व्यसनाधिनता इ. बाल विवाह होण्याचे प्रमुख कारणे आहेत. परंतु बाल विवाह केल्याने होणाऱ्या दुष्परिणामाचा सामना मुलगा-मुलगी व त्यांचे कुटुंब यांना करावा लागतो.
 बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आल्या असून या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी संधिका आहेत. या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. तसंच मुलीच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची 21 वर्ष पूर्ण होण्याच्या आगोदर लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे प्रतिपादन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी कले,
तसेच माता मृत्यूचे प्रमाण, कुपोषित मूल जन्माला येणे, त्यावर उपपाययोजना म्हणून मुलीना शिक्षण देणे आवश्यक आहे. मुला-मुलींनी शिक्षण पूर्ण केले पाहिजे, आपल्या सभोवताली कुठेही बाल विवाह हात असेल तर चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती दिली पाहिजे. 1098 ही बालकांसाठी तात्काळ मदत करणारी हेल्प लाईन आहे. 1098 या टोल फ्री क्रमांकावर मिळालेलो माहिती गोपनीय असते. जेव्हा बालकाला मदतीची गरज असते, संपर्क त्यावेळी 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती संदिप कोल्हे प्रकल्प समन्वयक चाईल्ड हेल्पलाईन यानी दिली, बालक म्हणजे काय, बालकांचे हक्क व अधिकार याबाबत तसेच बालकांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी समुदायातील लोकांनी पुढाकार घ्यावा. याबाबत माहिती दिली पाहिजे,
 अशी माहिती रेशमा पठाण सामाजिक कार्यकर्ता यांनी दिली.बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा होण्यासाठी आपण स्वनःपासून सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी बालविवाह निर्मूलन अधिनियम 2006 या कायद्याची प्रकरणी अमंलबजावणी होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांकडून बालविवाह जनजागृतीबाबत प्रतिज्ञा सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी दिली. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश इंगळे, श्रीमती चवने, शालेय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !