अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले प्रतिमापूजन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, थोर समाजसुधारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, उपजिल्हानिवडणूक अधिकारी संतोष राऊत यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा