शहराध्यक्षपदी विनोद पोतदार तर तालुकाध्यक्षपदी रामदास नागटिळक
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या पंढरपूर शहर व तालुका पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर झाल्या असून पंढरपूर शहराध्यक्षपदी विनोद पोतदार तर तालुकाध्यक्षपदी रामदास नागटिळक यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पंढरपूरची वार्षिक सर्वसाधारण बैठक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संघाचे मार्गदर्शक राधेश बादले पाटील, शंकर कदम, राजकुमार घाडगे, विवेक बेणारे, डाॅ.राजेश फडे, ॲड.अरविंद जाधव,
नागेश आदापूरे, मनोज पवार, तानाजी जाधव,गौतम जाधव यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी मागील वर्षाचे अहवाल वाचन करण्यात आले.तसेच संघाच्या उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी पंढरपूर शहर कार्यकारणीमध्ये शहर उपाध्यक्ष धनंजय राक्षे, कार्याध्यक्ष सुरेश गायकवाड, सचिव कुमार कोरे, खजिनदार संजय यादव, प्रसिध्दी प्रमुख दादासाहेब कदम, शहर समन्वयक मारूती वाघमोडे, शहर संघटक नेताजी वाघमारे, सदस्य विक्रम कदम, आशा क्षिरसागर यांच्या निवडी करण्यात आल्या तर तालुका कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष विजय नलवडे, कार्याध्यक्ष संतोष मोरे, सचिव संजय ननवरे, खजिनदार संजय रणदिवे, तालुका संघटक रवी कोळी, तालुका समन्वयक रोहन नरसाळे, सदस्यपदी लक्ष्मण शिंदे, नितीन खाडे, ऋषीकेश वाघमारे, सुनिल कोरके, राजेंद्र करपे, अभंगराव यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
या बैठकीसाठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तर यावेळी नुतन व मावळते पदाधिकार्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा