सांगवी येथील महिलेला विजेचा शॉक लागून मृत्यू सांगवी गावामध्ये हळहळ व्यक्त
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटुर परिसरातील सांगवी येथील घरामध्ये काम करत असताना टेबल फॅन ला सरकून ठेवण्यासाठी हात लागल्याने जोराचा शॉक लागला त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदर गावकरी यांनी परिसरात नागरिकांनी सदर महिलेला कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्रात येथून नायगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. असून डॉक्टरांनी मृत घोषित केले . शोभाबाई दिगंबर अलगुलवाड वय वर्ष 38 राहणार सांगवी ता नांयगाव येथील महिला घरातील कामे करत असताना अकरा वाजताच्या सुमारास साफसफाई करत असताना त्यात हात फॅनला सरकण्यासाठी हात लावले असता जोराचा शॉट लागल्यामुळे सदर महिलेचा मृत्यू झाला असे नातेवाईकांनी सांगितले. मृत्यू झालेल्या महिलांना पती दिगंबर अलगुलवाड व तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. सांगवी गावात शोककळा पसरली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा