एका वर्षात दुसरीच ग्रामसभा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून कुंटूर ग्रामपंचायत ची ओळख आहे . बिनविरोध ग्रामपंचायत काढले मात्र गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच ग्रामविकास अधिकारी वेळेवर जनतेचे प्रश्न सोडविण्यास यश आले नाही.
कुंटूर ग्रामपंचायत कार्यालय येथे 30/11/2023/ रोजी सकाळी 10-40 ला ग्रामसभा सुरवात झाली.
सरपंच सौ आशाताई कदम यांचा अध्यक्ष ते खाली ग्रामसभेला सुरवात झाली. ग्रामविकास अधिकारी नागेश येडसनवार यांनी गावातील पाणी स्वच्छता, नाली बांधकाम,सीसी रस्ता, फेवरबलाक, वीजेचे खांब, आसे कामे होणार असल्याचे सांगितले.
गावातील नागरिक अफरोज चौधरी यांनी ग्रामविकास अधिकारी यांना प्रश्न विचारला तीन दिवसात नोटीस काढून ग्रामसभा घेता येतेका,. सात दिवसाच्या अगोदर नोटीस लावून गावांमध्ये सर्वत्र दंवडी देण्याचे काम ग्रामपंचायतचे व ग्रामसेवक तुमचे असते . तुम्ही नोटीस वर 22 तारिक टाकून 27 ला नोटिसा लावल्या तुम्ही चुक केल्या. असे ग्रामसेवकाची खबर नागरिकांनी घेतली.
असल्याने नागरिकांनी पुन्हा ग्रामसेवकांना धारेवर धरत. सरपंच ग्रामसेवक यांनी आपलीच खेळी खेळत नागरिक सुचविले कामे करून देणार करणार आहोत असे सांगितले .
गेल्या 29 ऑगस्ट रोजी झालेलया ग्रामसभेतील प्रश्न मार्गी लागले नाहीत असे नागरिकांनी सांगितल्यामुळे होणार आहेत करणार आहोत असेच बोलून उडवडीचे उत्तर देऊन ग्रामसभा पुढे ढकलले. घरकुल बांधकाम करा लाभार्थींना बिल मिळेल, अशी माहिती आडे, सहायक अभियंता घरकुल यांनी सांगितले, विज बिल व कोटेशन भरून नागरिकांनी अवैध विज घेन बंद करा असे लाईनमन श्रीरामे यांनी सांगितले.
शौचालयाचा ,प्रश्न गावातील रस्ते ,नाली बांधकाम, पाणीपुरवठ्याचा, प्रश्न सोडवण्यात येईल अशी चर्चा ग्राम विकास नागेश येडसनवार यांनी केली . रसुल मख्खनसाब शेख, नांयगाव कांग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष नायगाव यांनी गावातील नाली बांधकाम करा, तंटामुक्त अध्यक्ष नवीन निवड करा, गावात स्वच्छता करा, नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करा, गावातील विज फिडर वेगळं करा, म ग्रामसेवक वेळेवर येत नसून ग्रामसेवकाची बदली करा, मागणी केली असून ग्रामपंचायत मध्ये नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यावेळी सांगितले. पत्रकार यांनी ग्रामपंचायत मध्ये व्हिडिओ शूटिंग करत असताना ग्रामपंचायतीची परवानगी घ्या , शूटिंग बंद करा असे ग्रामसेवकानी बोलले.
ग्रामसेवक चुक करतात, त्यांना माफ आहे का.. पत्रकार यांना फोटो व व्हिडीओ शुटींग करुदया असं नागरिक सांगितले. त्यावेळी ग्रामसेवकाची व सरपंच यांची बोलती बंद झाली. अफरोज चौधरी, रसुल मख्खनसाब शेख, बालाजी भोसले, बालाजी पवार, बाबुराव आडकीने, नागेश येडसनवार ग्रामसेवक ,सरपंच आशाताई कदम ,उपसरपंच शिवाजी पाटील होळकर सदस्य रुपेश गंगाधर कुंटुरकर, ,दत्ता नांलिकंठे ,सुधाकर झुंजारे , राहुल हनुमंते , डोके, रेखाताई अनिल कांबळे समुह संसाधन व्यक्ती, या सर्व सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते .
नागरिकांची वेळेवर कामे होत नसतील तर ग्रामसेवक यांची बदली करा असे नागरिकांचा एकच सूर निघाला त्यामुळे कुंटूर येथील ग्रामसभा पुन्हा वादळी सभा झाली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा