शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी..उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनु
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी..उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनु असलेल्या वाघलवाडा साखर कारखाना व व्हीपीके गुळ पावडर सिंधी ,डॉ.शंकरराव चव्हाण गुळ पावडर वाघलवाडा या तिन युनिटच्या माध्यमातून दि १५/११/२०२३ अखेर एकुण १,०१३५२/- मेट्रीक टनाचे उस गाळप पुर्ण झाले असून या कालावधीतील उस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर २५००/- रुपये प्रति मे.टनाने जवळपास २४,२४,६८१८४/- रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यांत आले असून त्याच बरोबर कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी व्हीपीके परीवारातील सर्व कर्मचारी बांधवांना बोनस देवुन यावर्षीची शेतकऱ्यांची/कर्मचाऱ्यांची/व्यापारी बांधवांची दिपावळी आनंदात केली.व्यक्ति तितक्या प्रकती असे म्हणतात. या जगात विविध प्रकारची माणसे आहेत कुणी भाग्यशाली माणसे तर काही सोन्याचा चमचा घेवून जन्माला येतात आणी सदैव यशस्वी आणी सम्रध्द होत असतात.
तर काहींना त्या अनुकुल परीस्थीतीचा फायदा उचलता येत नाही.काही माणसे सामान्य परीस्थीतीत जन्मतात, आणी आपल्या त्या छोटया विश्वात सुखसमाधानाने जगतात,काही माणसे परीस्थीतीसी दोन हात करत प्रतीकुल परीस्थीतुन पुढे येतात.अशी माणसे सामान्य परीस्थीतीत जन्म घेवून सुध्दा सामाजीक,शैक्षणीक,राजकीय,सहकार क्षेत्रात आपले कर्तत्व सिध्द करतात.विवीधक्षेत्रामध्ये आपल्या कर्तत्वाचा ठसा उमटवणाऱे एकमेव शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच नांव पुढ येत.त्यांनी आपल्या आचरणातुन हे सिध्द केले आहे.एका शीक्षकांने चार ते साडेचार हजार लोकांना रोजगांर मिळवुन दीला ही बाब उल्लेखनीय आहे.त्यांनी उभ्या केलेल्या उदयोगाची वार्षीक उलाढाल रुपये एक ते दिड हजार कोटींची आहे.ग्रामीण भागातील एका शीक्षकांने शुन्यातुन अक्षरशा साम्राज्य उभे केले आहे.या प्रवासात त्यांना विरोध झाला.लोकांनी वाईट चितले,पण ते खंबीर राहीले.आपण योग्य मार्गावरुन जात आहोत हा विश्वास बाळगुन वाटचाल करत राहीले.एक यशस्वी उदयोजक व लोकप्रीय राजकारणी अशी त्यांची कीर्ती आहे. नायगांव मतदार संघातील सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा..
तरी व्हीपीके उदयोग समुहाने उस उत्पादक शेतकऱ्यांना पुढील कालावधीसाठी उत्तेजनार्थ उस दर देण्याचे जाहीर केले आहे.
माहे ऑक्टोंबर ते डीसेंबर 2023 पर्यंत 2500/- प्रती मे.टन.
माहे 01 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 पर्यंत 2550/-प्रती मे.टन
माहे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 पर्यंत 2600/- प्रतीअ मे.टन
माहे 01 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत 2650/- प्रती मे टन
माहे 16 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत 2700/- प्रती मे टन
माहे 01 मार्च ते 15 मार्च 2024 पर्यंत 2750/- प्रती मे.टन
माहे 16 मार्च ते 31 मार्च 2024 पर्यंत 2800/- प्रती मे.टन
अशी माहीती कारखान्याचे सीइओ संदीप पाटील कवळे यांनी दिली..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा