अवैध लाकडाचा ट्रक जप्त
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुष्णुर येथील एमआयडीसी मध्ये फ्लॅट नंबर सी सेवन ऑब्लिक दोन जवळील रोडवर अवैध लाकुड वाहतुकीची ट्रक कडुलिंब, पळस ,जातीचे जळतंन वाहतूक करते वेळेस एका ट्रक मध्ये सदर जळतानाचे लाकडं दिसून आले गुप्त माहिती मिळताच वनपरिमंडळ अधिकारी एस. टी .गुरूपवार, वनरक्षक, एल.जी. शिंदे, वन मजूर मधुकर मोरे, भी.मा शामागिरी, राजू भालेराव, इरबा राऊलवाड यांनी सापळा रचून गाडी नंबर MH04, /BU-6160, गाडी ताब्यात घेऊन कारवाई केली.
सदर ट्रक बिलोली वनपरी मंडळ यांच्या ताब्यात देण्यात आले. कुंटूर परिसरात कृष्णुर परिसरातील अवैध वृक्षतोडचे जोरदार होत आहे, ट्रक व ट्रॅक्टरच्या साह्याने विक्री केली जात आहे. मात्र याकडे वनक्षेत्राधिकारी दुर्लक्ष करत होते त्यांना गुप्त माहिती दिल्यानंतर सदर ह्या वर्षातील हे पहिले कारवाईक असल्याचेही नागरिकांत बोलले जाते. वनक्षेत्र अधिकारी ग्रुपवर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णूर एमआयडीसीत धाड टाकून सदर ट्रक जप्त केला आहे .पुढील कारवाईक साठी बिलोली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात ट्रक लावण्यात आला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा