maharashtra day, workers day, shivshahi news,

गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं - आला बैलगाडा गाणं पाहून खासदार डॉ. अमोल कोल्हे झाले भावूक

माझ्या मातीतला खेळ तुम्ही वेगळ्या उंचीवर नेलात त्यासाठी ‘आला बैलगाडा’ गाण्याच्या टीमला मानाचा मुजरा - खा.डॉ. अमोल कोल्हें
Kha.Dr. Amol Kolhe , Ala bullock cart song , mumbai , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, मुंबई
खासदार डॉ. अमोल कोल्हे,  डिजीटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, गायक आनंद शिंदे, उद्योजक संतोष ठोंबरे, कृष्णा पंड्या तसेच मराठी ,हिंदी चित्रपट गोष्टीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये  ‘बीग हिट मीडिया’च्या ‘आला बैलगाडा’ गाण्याचा अनावरण सोहळा दणक्यात पार पडला

अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बीग हिट मीडिया प्रस्तुत ‘आला बैलगाडा गाण्याच्या’ संगीत अनावरण सोहळ्याला विशेष हजेरी लावली. आला बैलगाडा हे गाण सुप्रसिद्ध गायक ‘आदर्श शिंदे’ आणि सुमधूर गळ्याची गायिका ‘सोनाली सोनावणे’ यांनी गायले आहे. तर मिलिनिअर संगीतकार ‘प्रशांत नाकती’ याने या गाण्याचे संगीत केले आहे. ‘हृतिक अनिल मनी’ आणि ‘अनुष्का अविनाश सोलवट’ यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे.  

डॉ. अमोल कोल्हे आला बैलगाडा गाण्याविषयी सांगतात, “गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं. कारण, २०१९ ला जेव्हा लोकसभेची निवडणूक लढवत होतो. त्यानंतर जेव्हा जेव्हा संसदेत बोलायला उभं राहिलो. तेव्हा थट्टेनं बाकीचे खासदार उभं राहिलो की बोलायचे बैलगाडा की शिवाजी महाराज!! हे केवळ मनोरंजन नाही, ही ४०० वर्षांची परंपरा आहे. हे सर्व सामान्य शेतक-यांचं मनोरंजन आहे. यामुळे ग्रामीण रोजगाराला चालना मिळते. कारण २ हजार उंब-याच्या गावात जेव्हा ४ ते ५ हजार लोक येतात. तेव्हा त्या इकॉनोमीला एक चालना मिळते. गोडी शेव, भेल या सर्वांना एक रोजगार उपलब्ध होतो. त्याचबरोबर पर्यटनाला देखील चालना मिळते.”


पुढे ते पांड्या सरांना उद्देशून सांगतात, “आमचं मोठं स्वप्न आहे की जर स्पेनची इकॉनोमी बुलरन आणि स्पॅनिश बुल फाइट वर चालू शकते. तर आपण पण आंतरराष्ट्रीय टुरीझम आपल्या ‘बौलगाडा’साठी करू शकतो. बीग हिट मीडियाचे निर्माते हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट आणि संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो. कारण मुलं एखादं स्वप्न पाहतात आणि पालक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहतात. ते अस्तित्वात येतं. तुम्ही अश्या विषयाला निवडलं आहे जो विषय फार महत्वाचा आहे. आपल्या भारतामध्ये अनेक परंपरा आहेत, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. पण त्याचं कल्चरल नरेटीव्ह करायला आपण कुठे तरी कमी पडंत असतो. पण तुम्ही या गाण्यातून ते योग्यपणे मांडल.”

पुढे ते संगीतकार प्रशांत नाकतीला म्हणाले “गाण एकदम नादखुळा झाल आहे. बीग हिट मीडियाने हा विषय निवडला त्यासाठी तुमच कौतुक. तुमच्या गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळो यासाठी शुभेच्छा”

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !