समाजाच्या विविध स्तरातून होत आहे कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
पीपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृह नांदेड येथे ऑल जर्नालिस्ट ऍण्ड फ्रेंड्स सर्कल यांच्या वतीने रविवारी १८ वे वार्षिक संमेलन आयोजीत करण्यात आले होते यावेळी प्रवीण गीते यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार देवेंद्र भुजबळ जतीन देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल गणेश कोळी बाळकृष्ण कासार व इतर मान्यवर उपस्थित होते प्रवीण गीते यांनी लोकजागर परिवाराच्या माध्यमातून उपेक्षित,वंचित घटकासाठी आर्थिक साहित्यरुपी तसेच इतरही बाबतीत त्यांचे सर्व सहकारी मदत करण्याचे काम करीत असतात.
आपल्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी वाचन प्रेरणा दिन म्हणून ते साजरा करतात त्या अनुषंगाने सरकारी शाळेतील गरजू विद्यार्थांना वही पेन वितरण केले जाते त्याच बरोबर फुले- शाहू - यांच्या विचारांना अभिप्रेत असलेला विचार समाजात रुजविण्यासाठी ते सतत प्रयत्नरत असतात या विचाराच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात एक तरुणाईच जाळ निर्माण केलं आहे वक्तृत्व, दातृत्व, आणि कर्तुत्व याचा संगम म्हणजे प्रवीण गीते . त्यांचा या कामाची नोंद घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे यावेळी नांदेड येथे दीपक नागरे, संजय सोनुने ,कारभारी गीते,भगवान नागरे याकूब शेख , भगवान देशमुख व इतर सहकारी उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा