maharashtra day, workers day, shivshahi news,

साखरखेर्डा तालुका होणार - आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या पाठपुराव्याला मिळणारी यश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस लवकरच घोषणा करण्याची शक्यता
Formation of Sakherkherda Taluka, sindkhedraja, buldhana, rajendra shingane, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेड राजा (प्रतिनिधी आरीफ शेख)
नवीन तालुका निर्मितीसाठी आवश्यक ते अहवाल शासनाने मागविले आहेत. त्यानुसार सिंदखेडराजा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित असलेला साखरखेर्डा तालुका निर्मितीचा प्रश्न आता लवकरच सुटेल अशी आशा निर्माण झाली आहे.
मा.वसंतराव मगर यांनी सर्वप्रथम साखरखेर्डा तालुका निर्माण व्हावा यासाठी एक समिती स्थापन केली. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि महसूल मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सदर तालुकानिर्मितीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर आमदार डॉ राजेंद्र शिंगणे हे या समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी तत्कालीन युती सरकारच्या काळात या मागणीचा रेटा सुरुच ठेवला. पण तत्कालीन शासनाने त्यावेळी २० तालुक्यांची निर्मिती केली त्यामधून साखरखेर्डा हे नाव वगळण्यात आले. पुन्हा निराश पदरी पडली.
परंतु त्यानंतर हे तालुका निर्मिती साठी जन आंदोलन झाली. रास्तारोको करण्यात येऊन या पध्दतीने शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. २०१६ ला सुध्दा तत्कालीन मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी घाटाखाली खामगाव जिल्हा व लाखनवाडा व सिंदखेडराजा तालुका व्हावा ही विधानसभेमध्ये मागणी केली होती. परंतु शासनाची भूमिका पाहत आंदोलक शांत झाले.
दि.१९ डिसेंबर रोजी आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांच्या बरोबरच साखरखेर्डा तालुका निर्मिती होणे ही काळाची गरज आहे. हे विधानसभेमध्ये अगदी स्पष्ट करुन सांगितले.
साखरखेर्डा तालुका निर्मितीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी व शासकीय कर्मचारी यांचा खरोखरच फायदा होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे घोषणा करतीलच यात कसलीही शंका नाही.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !