maharashtra day, workers day, shivshahi news,

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनस्थळाची पाहणी

महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारे उपक्रम प्रदर्शनस्थळी आयोजित करावेत

Education Minister Deepak Kesarkar , Inspection of National Pediatric Exhibition Site , pune , shivshahi news.


शिवशाही न्यूज वृत्तसेवा पुणे, (जिल्हा प्रतिनिधी अभिषेक जाधव)

पुणे दि २१:- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ५० व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनस्थळाची पाहणी करुन पूर्वतयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारे उपक्रम प्रदर्शनस्थळी आयोजित करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, डॉ. नेहा बेलसरे आदी उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, महाराष्ट्राची सांस्कृतिक विविधता ही सर्वांच्या उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे राज्याच्या संस्कृतीचे दर्शन या प्रदर्शातून घडले पाहिजे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा संकुलाचा परिसरही दाखविण्यात यावा. राज्याच्या विविध भागातील खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देणारी भोजन व्यवस्थाही करण्यात यावी, असे श्री. केसरकर म्हणाले. 

५० वे राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन २०२३

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत चक्राकार पद्धतीने मुलांसाठी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ५० व्या प्रदर्शनाचे यजमानपद महाराष्ट्राला मिळाले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २६ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 


शालेय वयातच विज्ञान विषयाची गोडी लागावी व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. वय वर्षे १४ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना आपली सृजनशीलता दाखवण्यासाठी बाल वैज्ञानिक प्रदर्शनीच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. 

या प्रदर्शनामध्ये राज्यशासन, केंद्रीय विद्यालय संघटन, नवोदय विद्यालय, ॲटोमिक एनर्जी केंद्रीय विद्यालय, तिबेटीयन विद्यालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संलग्न शाळा आदी विविध व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी होणार आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामधून राष्ट्रीय स्तरावर पात्र झालेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून शालेय विद्यार्थी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाला भेट देणार आहे.


या प्रदर्शनात २२५ दालनाची उभारणी केली जाणार केली आहे. विज्ञानविषयक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील शासकीय व अशासकीय संस्थांचे दालन, महाराष्ट्राची संस्कृती, पारंपरिक खेळणी आदी विषयांचे नाविन्यपूर्ण दालन या बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे वैशिष्ट्य राहणार आहे. विविध सांस्कृतिक कलागुणाचे सादरीकरण, विविध मार्गदर्शनपर व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. येडगे यांनी दिली आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !