मांजरम येथील तबलिकी जमातच्या इज्तेमाला परवानगी देऊ नये अन्यथा सुन्नी जमातचा आमरण उपोषणाचा इशारा.

मांजरम वासीयांनी डोक्यावर पांढरा कपडा  (वस्त्र-आच्छादन) बांधून काढला मोर्चा
The people of Manjaram took out a march , manjaram , naigaon , nanded , shivshahi news.



 शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर 

    नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे दि. २४ व २५ नोव्हेंबर रोजी तबलीकी जमातच्या इज्तेमाची तयारी सुरू आहे इस्तेमाच्या परवानगीसाठी नायगाव पोलीस ठाण्यात अर्जही करण्यात आला परंतु सदर इस्तेमाला सुन्नी जमातचा प्रचंड विरोध असून यापुर्वी मांजरम येथे सुन्नी व वहाबी असा वाद निर्माण होऊन हाणामारीची घटना घडली होती व अनेकजन यामध्ये गंभीर जखमी झाले होते यामुळे परस्पराविरोधात गुन्हाही नोंद झाला तसे नायगाव पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आला आहे विशेष म्हणजे मांजरमसह नायगाव तालुक्यात ९५% सुन्नी जमातचे  मुस्लिम बांधव आहेत यामुळे तबलीकी जमातचा येथे काहीही संबंध येत नाही यामुळे सदर इज्तेमाला परवानगी देऊ नये अन्यथा दि.२० नोव्हेंबर २०२३ पासून मांजरम व नायगाव तहसील कार्यालया समोर सुन्नी जमातच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे नायगाचे तहसीलदार व मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे देण्यात आला आहे.

     मौजे मांजरम येथे दि.२४ व २५ नोव्हेंबर २०२३ रोजी दोन दिवसीय तबलीकी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे परंतु नायगाव तालुक्यात सुन्नी जमातच्या विचारधारेचे समाज बांधव मोठ्या प्रमाणात असून  ९५%  सुन्नी मुस्लिम समाज आहेत यामुळे गावकरी व अर्जदाराचे त्या तबलीगी जमातीशी कोणतेही संबंध नाही तसेच सन १९९६/९७ मध्ये मांजरम येथे अशाच एका कार्यक्रमात सुन्नी व वहाबी वाद निर्माण होऊन हाणामारीची घटना घडली होती यामुळे परस्परविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला तसे नायगाव पोलीस ठाण्यात नोंदही आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले असून अनेक गावातील सुन्नी जमातीच्या वतीने तबलीकी इज्तेमासाठीची परवानगी नाकारण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात येत आहे तर मांजरम मध्ये सुन्नी जमातीच्या लोकांनी डोक्यावर पांढरा कपडा प्रेतवर घालण्याचे (वस्त्र-आच्छादन) बांधून मोर्चा काढला व प्रशासनाने  तबलीकी जमातीच्या इज्तेमाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली.


 नायगाव तालुक्यात सुन्नी जमातीचे मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हाधिकारी यांनी सुन्नी जमातीच्या भावना लक्षात घेऊन तबलीगी इज्तेमाला परवानगी देऊ नये अशी मागणी नायगाव तालुक्यातील विविध गावातील सुन्नी जमातच्या वतीने करण्यात आले अन्यथा दि.२० नोव्हेंबर २०२३ पासून मांजरम व नायगाव तहसील कार्यालय अशा दोन ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा मा.जिल्हाधिकारी नांदेड,मा.उपजिल्हाधिकारी साहेब बिलोली, मा.उपविभागीय पोलीस अधिक्षक साहेब बिलोली,मा.तहसिलदार नायगांव,मा.पोलीस निरिक्षक साहेब, नायगांव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे विविध गावातून दिलेल्या निवेदनावर असंख्य सुन्नी मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
( नायगाव नरसी मांजरम )


सन १९९७ मध्ये मांजरम,२००७ मध्ये वन्नाली ता.देगलूर,
२००९ मध्ये काटकळंबा ता.कंधार येथे दंगा होऊन अनेक जन जखमी झाले होते तेच तबलीगी जमातचे काही लोक मांजरम येथे पुन्हा कार्यक्रमाची तयारी करत आहेत जेकी सुन्नी जमातचा यामध्ये काहीही संबंध नाही.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !