सर्व व्यापारी वर्गाने बंद पाळून आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहे.
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर
म्हसणे फाटा या ठिकाणी सर्व व्यापारी वर्गाने बंद पाळून अंतरवाली सराटी या ठिकाणी माननीय मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहे. त्यासाठी म्हसणे सुलतानपूर येथील ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेऊन आपला पाठिंबा नोंदवला. लवकरात लवकर सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे अशा घोषणा देण्यात आल्या. व पूर्ण मसणे फाटा व आजूबाजूच्या गावांमध्ये बाबुर्डी,पळवे खुर्द, पळवे बुद्रुक, घाणेगाव, जातेगाव या गावांमध्ये बंद पाळण्यात आला.
असे निवेदन मा. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम पोलीस निरीक्षक सुपा पोलीस स्टेशन यांना देण्यात आलेले आहे व सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे. घोषणा देऊन मसणे फाटा चौक या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. या ठिकाणी बहुसंख्य मराठा बांधव उपस्थित होते.तसेच भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे जिल्हा अध्यक्ष योगेश कुलथे यांनी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये राजकीय पुढार्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसे फलक ही लावण्यात आलेले आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा