संविधान दिंडी, तिरंगा झेंडा रॅली , वारकरी वेशभूषेने वेधले लक्ष
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता नरसी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथुन शाळेतील विद्यार्थी व तृतीयपंथीय तसेच सर्व समाजाचे महिला भगिनींनी तिरंगा झेंडा हाती घेऊन वारकरी वेशभूषेत संविधानाच्या प्रतीची व संविधानाला अभिप्रेत घोषणा देत दिंडी व रॅलीची सुरुवात (न्यायाधीश दिवाणी फौजदारी न्यायालय नायगाव येथील श्रीमती एस.टी. गिते व नायगावचे सहन्यायाधीश आर.एम.लोळगे यांच्या हस्ते पिंपळ वृक्षाचे वृक्षारोपण करून आगळावेगळा संदेश देत संविधान दिन साजरा करण्यात आले.
सदर दिंडी जुनी नरसी ते पोलिस चौकी मार्गे बिलोली रोडवरील शिवकृपा मंगल कार्यालय येथील कार्यक्रम ठिकाणी सांगता करण्यात आले.
सविधान जागृती महोत्सवाला उध्दघाटक म्हणून न्यायाधीश दिवाणी फौजदारी न्यायालय नायगाव येथील श्रीमती एस.टी. गिते व नायगावचे सहन्यायाधीश आर.एम.लोळगे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख व्याख्याते म्हणून ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, सामाजिक कार्यकर्ते एच.पी.कांबळे हे होते. तर अध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार चव्हाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत, प्राचार्य एस.जी.मांदळे, सपोनी संकेत दिघे , प्रदीप वाघमारे बिलोली, गौतम कांबळे सह आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमांच्या आरंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानचे वाचन सामाजिक कार्यकर्ते मारोती वडडे यांनी केले.
नरसी येथील सविधान जनजागृती हा संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही एका जाती धर्माचा नसून तो देशाच्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी असलेल्या संविधानाचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमासाठी सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही पक्षाचा ध्वज न आनता देशाचा राष्ट्रीय ध्वज नरसी येथून निघालेल्या मोटारसायकल रॅलीत व उपस्थित नागरिकांच्या हातात दिसून आले व रॅलीतील प्रत्येक नागरिकाने भारतीय संविधानाच्या नियमाचे
पालन करुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आले असल्याचे उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद फकीरे यांनी केले तर सूत्रसंचालन सिद्धार्थ सोनकांबळे आभार कमलाकर जमदडे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष भास्कर भेदेकर, उपाध्यक्ष धम्मानंद सोनकांबळे, कार्याध्यक्ष मोहिदीन सर, शेख, नागसेन जिगळेकर, गौतम कांबळे, प्रदीप वाघमारे, किरण इंगळे, संदीप सोनकांबळे केरूरकर, सुनील कांबळे, संदीप उंमरे, साईनाथ कांबळे, सचिन भेदे राहुल गायकवाड, प्रकाश होणसांगडे, किशोर वाघमारे, निळकंठ तरटे, खाज्जाभाई शेख आदींनी परिश्रम घेतला. सविधान जागृती महोत्सवाला परीसरातील सर्वच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा