maharashtra day, workers day, shivshahi news,

टेल टू हेड आणि पूर्ण दाबाने पाणी देण्याची आमदार समाधान आवताडेंची मागणी पूर्ण

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात पुन्हा म्हैसाळचे पाणी दाखल
MLA samadhan autade , mangalwedha , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी राज सारवडे)
 म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, हुलजंती या १९ गावांना १२७० एमसीएफटी एवढे पाणी मंजूर असताना केवळ ८० एमसीएफटी म्हणजेच फक्त ६ टक्के पाणी या गावांना आजपर्यंत देण्यात आले होते.  परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीची बैठक सांगली येथे पार पडली होती. सदर बैठकीमध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यासाठी सांगली जिल्हा जलसंपदा विभाग अंतर्गत म्हैसाळ कालवे उपविभाग वितरिका क्रमांक -२ अन्वये तरतूद असणारे पाणी पूर्णदाबाने देण्यात यावे त्याचबरोबर वरील भागांना या योजनेतून ज्या पद्धतीने पाणी मिळते त्याच पद्धतीने पाण्याचे वाटप मंगळवेढा तालुक्यातील जनतेसाठी करण्यात यावे अशी मागणी केली होती.


त्या बैठकीमध्ये आमदार आवताडे यांच्या या मागणीची दखल घेऊन टेल टू हेड अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना या पाण्याची तरतूद करण्याचे सांगली व सोलापूर जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांना आदेशित करण्यात आले होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे आमदार आवताडे यांच्या या मागणीला अखेर मोठे यश येऊन म्हैसाळ योजनेतून  मंगळवेढा तालुक्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरू झाले आहे. सुरु झालेल्या या पाणी आवर्तनामध्ये वितरिका क्रमांक -२ मधून मारोळी सलगर बु, सलगर खु, जंगलगी, महमदाबाद हु, या गावांना ९० क्युसेस पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर उमदी डी.वाय. मधून आसबेवाडी,  शिवणगी, लवंगी, सोड्डी, सलगर बु या गावांना पाणी येत्या आठ दिवसात रोटेशन प्रमाणे येणार आहे. तरी म्हैसाळ योजनेअंतर्गत पाणी पोहोचलेल्या गावातील शेतकरी व नागरिकांनी या पाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजनेमधून उर्वरित रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, बावची, पौट, येळगी, या उर्वरित गावांना येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये पाणी पोहचणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजनेतून या भागांमध्ये पाणी आल्यामुळे गेली अनेक वर्षे सदर योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा करत असलेल्या या भागातील जनतेला व बळीराजाला आमदार आवताडे यांच्या कार्यतत्पर नेतृत्वशैलीमुळे पाण्याच्या रूपाने मोठा आधार निर्माण झाला आहे.
 

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !