पारनेरमध्ये राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने पत्रकार बांधवांचा सन्मान

पोलीस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू 

Honoring journalists on the occasion of National Journalists' Day , parner , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी , सुदाम दरेकर पारनेर   
पोलीस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे प्रतिपादन पारनेर चे पोलीस निरीक्षक संभाजी राव गायकवाड यांनी केले आहे .
 पारनेरमध्ये राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने पत्रकार बांधवांचा सन्मान व फराळ वाटप कार्यक्रम करण्यात आला.कार्यशिल पत्रकार,व समाजासाठी वाहून गेलेल्या पत्रकारांचा सन्मान करण्याचा मानस असल्याचे शिवतेज सोशल फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा मिनाक्षी जगदाळे यांनी सुचविले , त्यानुसार राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधत पारनेर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान व दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे शिवतेज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीपराव बोरुडे यांनी सांगितले.


 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी राव गायकवाड, उपनिरीक्षक हनुमान उगले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दत्ता गाडगे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ता उनवणे , शिवसेनेचे किसान सेनेचे तालुकाप्रमुख गुलाबराव नवले , पंचायत समितीचे सदस्य डॉ श्रीकांत पठारे हे उपस्थित होते.
या प्रसंगी जेष्ठ पत्रकार विनोद गोळे, संतोष तांबे,लतिफ राजे, विजय रासकर, महेश शिंगोटे, बाबाजी वाघमारे , संदीप गाडे, विशाल फटांगडे,वसंत रांधवण, सागर आतकर,आनंदा भुकन,नितीन परंडवाल, ठकाराम गायखे,सुदाम दरेकर या २१ पत्रकारांचा पारनेर चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पारनेर पं.स.सदस्य डाॅ.श्रीकांत पठारे,उपनिरीक्षक हनुमान उगले व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी पत्रकारांना फराळ वाटपही करण्यात आले आहे.


 पत्रकार बांधवांना शुभेच्छा देताना पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड म्हणाले की , पोलीस आणि पत्रकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.ज्यावेळी मुंबईवर २६/११ चा हल्ला झाला, त्यावेळी ज्या पद्धतीने पोलीस लढत होते, त्याच पद्धतीने पत्रकार देखील लढत होते.पोलिसांकडे संरक्षणासाठी  वेपनास्र होते.पण पत्रकारांकडे कुठलेही वेपन नव्हते.त्यांच्याकडे त्यांची लेखनी आणि अचूक चित्र कॅमेऱ्यात टिपून ते जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे  करत होते. कुठलेही एखादे खाते किंवा विभाग हे खराब नसते,त्यांच्यामध्ये काही गोष्टी,व्यक्ती खराब असतात आणि त्यामुळे संपुर्ण पणे त्या विभागाला गालबोट लागते.संपूर्ण पोलीस खातं जर कोणी खराब म्हणेल ,तर मग संरक्षण कोण करतंय...? गुन्हेगारीला पायबंद कोण घालतंय...? हा प्रश्न देखील निर्माण होईल.सर्व पत्रकार वाईट नसतात.आज पत्रकारितेचे ज्या पद्धतीने असे वाभाडे काढले जातेय , ते पुर्णपणे चुकीचे आहे . मग या मी मी म्हणाऱ्यांची नशा नक्की कोण उतरवतंय...? 


निश्चितच पारनेर तालुक्यातील पत्रकारांचे काम चांगले आहे. पोलीस व पत्रकारांना , लोकांना  जवळून पाहण्याची सवय नसते. दोघांमध्ये अंतर असेल तर निश्चितच शंका निर्माण होते.आपल्यात संवाद नसल्यामुळेच एकेरी मूल्यमापन केले जाते.त्यामुळे चुकीच्या लोकांसोबत दोघांनाही एकाच तराजू त तोलले जाते. समाजामध्ये काम करत असताना आपण लढत असतो.आपली कोणी दखलच घेत नसेल, तर मात्र आपण सर्वसामान्य माणसं आहोत.जरी पोलीस असो , वा पत्रकार असो, तरी आपण आधी माणूसच आहोत. कोणीतरी आपल्याला लढ म्हणण्याचं पाठबळ , आपल्या ला देणं गरजेचं असतं आणि ते पाठबळ देण्याचे पवित्र कार्य शिवतेज सोशल फाउंडेशनने या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने केले जात आहे, असे ही पोलीस निरीक्षक गायकवाड शेवटी म्हणाले .
यावेळी बोलताना पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ.श्रीकांत पठारे म्हणाले की ,निःपक्ष भूमिकेतून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा. खरं पाहायला गेलं, तर पत्रकार हे सामाजिक क्षेत्र आहे.बाकीच्या ठिकाणी पत्रकारिता कशी चालते, हे मला माहीत नाही.पण पारनेर तालुक्यात खूप चांगल्या पद्धतीने पत्रकार बांधव काम करत आहेत.खरं तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.अनेक अडचणींना सामोरे जाऊन पत्रकार बांधव रोकठोक निर्भिड निःपक्ष काम करत असतात , असे ही डॉ . पठारे म्हणाले .


यावेळी मनोगत व्यक्त करताना राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दत्ता गाडगे व पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ता उनवणे यांनी शिवतेज मित्र मंडळाच्या या उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त करत, सर्व पत्रकार बांधवांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.उपस्थित पत्रकार बांधव व मान्यवरांचे आभार शिवतेज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप बोरुडे यांनी मानले .
 पत्रकारांचा सन्मान आणि तो ही पत्रकार दिनाच्या दिवशी केला जातो , हे पारनेर तालुक्यातील पहिलेच उदाहरण असल्याचे यावेळी उपस्थित पत्रकारांनी सांगितले . या सन्मान सोहळ्याने सर्व पत्रकार भारावून गेले .
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !