प्रहार संघटनेची अनाथा सोबत दिवाळी साजरी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
भोकर ता. प्र. येथील श्रीकृष्ण मंदिरात प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने महंत कपाटे बाबा व तेथील सर्व सेवार्थी सज्जनांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या कार्यकर्तृत्वा बद्दल गौरव करन्यात आला.जन सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून अनेक अनाथाना आश्रय देऊन त्यांना सन्माने जगता यावं या साठी सदोदित धडपड करणारे महंत श्री कपाटे बाबा यांचा प्रहार चे तालुकाध्यक्ष शेखर कुंटे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश चंद्रे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, व मंदिरातील सर्व सेवार्थी आणि अनाथ बालकांना मिठाई,फराळ,फळे देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
या वेळी प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.शेखर कुंटे,नांदेड जिल्हा दिव्यांग क्रांती संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख श्री. राजेश चंद्रे , भोकर तालुका पदाधिकारी श्री.कोकने साहेब, पोमनळा शाखाध्यक्ष श्री.गजानन सोळंके,श्री.योगेश सूर्यवंशी,श्री.माधव तगडपले,लखन धात्रक,विकास आलेवाड,माधव बेरदेवाड आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थित होती
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा