वंचित घटकांसाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे – माजी आमदार प्रशांत परिचारक

महिलांना साड्यांचे तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
Former MLA Prashant Parichark , pandharpur , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर ( शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
 सर्वत्र दिवाळी आनंदाने आणि उत्साहाने साजरी होत असताना समाजातील निराधार व गरीब मात्र या आनंदापासून दूर राहू नयेत म्हणून या वंचित घटकांसमवेत भारतीय जनता पक्ष पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी इसबावी  विसावा मंदिर येथे पालावरची दिवाळी साजरी केली. यावेळी महिलांना साड्यांचे तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना माजी आमदार प्रशांतराव परिचारक म्हणाले वंचित, निराधार मुले देखील समाजाचे घटक आहेत. यांना देखील आपल्या प्रमाणे सण, समारंभ याचा आनंद घ्यायचा असतो. परंतू त्यांना त्यांच्या परिस्थीतमुळे या गोष्टींचा आनंद घेता येत नाही. 
तसेच भटक्या विमुक्ततांशी आमचे भावनिक नाते असल्याने त्यांच्यासोबत यंदाची दिवाळी भाजपाचे सर्व पदाधिकारी यांनी साजरी केली आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या व त्यासोबतच आपल्या परिवारातील वंचित बंधू सोबत एक दिवा एकतेचा प्रज्वल करून नवीन विचार समाजामध्ये प्रकाशीत करण्याचं काम केलं आहे. 
दीप प्रज्वलन करून सणाचे महत्व व एकतेची परिभाषेची जाणीव करून दिली आहे. ही दिवाळी प्रत्येक घटकांसाठी सारखे असते या सणांमध्ये श्रीमंत गरीब उच्च व निश्चय असे कोणतेही भावना नसून हे सण माणुसकी व समाजामध्ये रुजवण्याचं काम केले आगामी सण आपण याच पद्धतीने करावे असे माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले. 
यावेळी सतिश मुळे, लक्ष्मण शिरसट, गणेश अधटराव, पंडीत भोसले, भास्कर कसगावडे, सुभाष मस्के, विक्रम शिरसट, अनिल अभंगराव, संग्राम अभ्यंकर, आंबादास धोत्रे, सुनिल भोसले, धर्मराव घोडके, नवनाथ रानगट, सनी मुजावर, सुनिल ढोले, सचिन शिंदे, माऊली हळवणकर, दादा कोळेकर, विजय भुसनर, अक्षय वाडकर, रोहित पानकर, प्रशांत वाघमारे, संदिप कळसुले, विष्णु सुरवसे, विकी अभंगराव, दिपक येळे आदी मान्यवर पांडुरंग परिवार व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !