माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या शाळेच्या आठवणी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
मागील वर्षांपासून 2007 सालातील 12 वी बॅचच्या तत्कालीन माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह - मेळाव्याचे दिवाळीच्या सुट्टी मध्ये मागील वर्षांपासून आयोजन करण्यात येत आहे या वर्षीचे आयोजन करण्यासाठी कृती समितीचे गठन करण्यात आले त्यात सर्वानुमते शंकरराव भालेराव यांची कृती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 15.11.2023 रोजी या वर्षीचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह-मेळावा आयोजित करण्यात यावा असे ठरले.हा स्नेह-मेळावा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश हा होता की आपल्यातील काही माजी विद्यार्थी हे शासकीय,राजकीय,सामाजिक,कृषी,शैक्षणिक आणि खाजगी क्षेत्रात मोट्या पदावर कार्यरत आहेत या सर्वांची भेट व्हावी आणि यातून आपण सर्व माजी विद्यार्थी एकमेकांच्या परत एकदा संपर्कात येऊन समाजातील गरीब,होतकरू,शोषित,वंचित आणि गरजू लोकांसाठी कार्य करण्यासाठी तसेच आपल्यातील कोणत्या मित्राला काही अडचण आली असेल त्याला सर्वांनी मिळून मदत करीत त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठीच्या उद्दात हेतूने प्रेरित होऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद आदरणीय गुरुवर्य माधवरावजी सोंजे सर,राणी लक्ष्मीबाई माध्यमिक शाळा नरसी येथील सहशिक्षक यांनी भूषविले, विद्यार्थी प्रतिनिधी तथा नगरपंचायत नायगाव येथील विद्यमान नगरसेवक पंकज पाटील चव्हाण कार्यक्रमाला प्रमुख अतिथीच्या रुपात लाभले.डिजिटल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष तानाजीराव शेळगावकर तसेच डिजिटल मीडिया तालुका उपाध्यक्ष हणमंतराव चंदणकर दोन्ही पत्रकार मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तद्नंतर उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.उपस्थित विद्यार्थ्यांपैकी प्रकाश लालवंडीकर,रोहित येरडे,बालाजी पा.ढगे,प्रा.अखिल येवतीकर आणि प्रा.गणेश कुऱ्हाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच सार्वजनिक जीवनात मैत्रीचे महत्व विषद केले.
माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर मान्यवर जयप्रकाश जी गुट्टे साहेबांनी आपल्या भाषणात मैत्री ही निखळ स्वछ पाण्यासारखी असते ती कायम जपली पाहिजे त्याचबरोबर त्यांच्या भूतकाळातील मैत्रीचे अनेक दाखले देत मैत्रीच्या नात्याचे बंध घट्ट असावेत असे त्यांनी मत मांडले व 16 वर्षानंतर धावपळीच्या जीवनात सर्व तुम्ही एकत्र आलात कायम असेच एकत्र राहा तसेच कार्यक्रमाच्या आयोजकांचे उत्तम नियोजन केल्याबद्दल आभार मानले
विद्यार्थी प्रतिनिधी पंकज पाटील चव्हाण यांनी त्यांच्या भाषणात भावना व्यक्त करीत असताना एकमेकांच्या अडचणीत,संकटात प्रत्येकाला साथ देणे गरजेचे आहे.या अनौपचारिक कार्यक्रमाच्या आयोजनाचे भरभरून कौतुक केले व पुढील वर्षी आपण चांगला कार्यक्रम घेण्याचे आश्वस्त केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नायगाव तालुक्यातील जेष्ठ पत्रकार बांधव कार्यक्रम स्थळी सदिच्छा भेट दिली तद्नंतर दैनिक पुढारी वृत्तपत्राचे प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार बाळासाहेबजी पांडे साहेब, दैनिक सत्यप्रभा वृत्तपत्राचे प्रतिनिधी एस.एम.मुदखेडकर दैनिक लोकमत समाचार वृत्तपत्राचे प्रतिनिधी बालाजी नागठाणे सर,दैनिक लोकपत्र समूहाचे तालुका प्रतिनिधी नागेश पा.कल्याण,शिवशाही न्युज समूहाचे प्रतिनिधी शिवाजी पा.कुंटूरकर आणि दैनिक सांजशक्ती वृत्तपत्राचे प्रतिनिधी निळकंठ पा.जाधव वरील सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करून त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा