ग्रामपंचायतचा ठराव ; पुढील मतदानावर बहिष्कार
शिवशाही वृत्तसेवा नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढील सर्व निवडणूक मतदानावर बहिष्कार तर राजकीय पक्षांच्या सर्वच आजी माजी खासदार, आमदार, मंत्री ,पुढारी व नेत्यांना आलूवडगाव मध्ये गावबंदी करण्यात आले असल्याचा ठराव आलूवडगाव ग्रामपंचायत कार्यालयाने घेतला आहे.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला गेली अनेक वर्षापासून आरक्षण संघर्ष करून सुधा मिळत नाही मराठा समाजातील अनेक बांधव आरक्षणासाठी शहीद झाले तरी पण या राजकीय पुढार्यांना जाग येत नाही म्हणून राजकीय पुढाऱ्यांचा निषेध म्हणून सकल मराठा समाजाने आलुवडगाव बस स्टॉप ला गाव बंदीचे बॅनर लावून सर्व पक्षीय राजकीय पुढार्यांना गावबंदी केलेली आहे व तहसीलदार नायगाव यांनी आपल्या माध्यमातून शासनाकडे मराठा समाजाचा तीव्र विरोध कळवावे व सर्व पक्षीय आजी,माजी खासदार, आमदार, मंत्री,नेत्यास गावात येण्यास कायदेशीर बंदी घालावी आसे निवेदनात नमुद केलेले निवेदन दि.३० ऑक्टोबर २०२३ रोजी तहसीलदार नायगाव यांना निवेदन सकल मराठा समाज आलुवडगाव च्या वतीने देण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा