अंचोली येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या ग्रामसभेत ठराव पास करून दिले निवेदन
शिवशाही वृत्तसेवा नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील अंचोली येथे दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत मराठा समाजास आरक्षण मिळणयासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे मराठा व कुणबी मराठा हे एकच असून सरसकट मराठा समाजास आरक्षण लागु करण्यात यावे तसेच मराठा समाजास जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत येनारया पुढील मतदानावर बहिष्कार व सर्वच पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना गावात बंदी करण्याचा निर्णय ठराव सर्वानुमते ग्रामसभेत पास करण्यात आल्याचे निवेदनात नमुद केल्याचे निवेदन दि.२५ ऑक्टोबर २०२३ रोजी नायगाव तहसीलदार यांना देण्यात आले या निवेदनावर अंचोली ग्रामपंचायत कार्यालयाचे संरपंच सौ.आश्विनी अशोकराव मोरे व ग्रामसेवक आर.जी.मुदखेडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या विषयावर आपल्या समाजाला जागृत करून अंतरवली सराटी येथील उपोषण बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा म्हणुन अंचोली येथील ग्रामस्थांना माहिती देऊन पाठिंबा देण्यात यावे म्हणुन सामाजिक चळवळीत अग्रेसर आसनारे माॅ जिजाऊ प्रतिष्ठान अंचोली चे संस्थापक अध्यक्ष तथा शिवबा संघटनेचे नांदेड जिल्ह्य अध्यक्ष गोविंद माधवराव पा.मोरे अंचोलीकर यांनी मार्गदर्शन करून पाठिंबा देण्यात आला यावेळी अशोक मोरे ( सरपंच प्रतिनिधी) बालाजी निळकंठ मोरे, संभाजी शंकर मोरे,मारोती मोरे, अशोक मोरे,विठ्ठल शिंदे,राम मोरे, बळवंत मोरे,वैभव मोरे,राजेश मोरे, गोविंद मोरे सह अंचोली येथील गावकरी मंडळी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा