रामतीर्थ ठाण्याच्या हद्दीतील घटना
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नरसी-देगलूर रोडवर लोहगावे यांच्या शेतात गुरुवारी सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. चेहरा रक्ताने माखलेला असल्याने मयत व्यक्ती कुठला आहे याबद्दल अद्याप काहीही माहिती मिळाली नाही. रामतीर्थ पोलीसांनी प्रेताचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी नायगाव येथील रूग्णालयात पाठविले .
नरसी-देगलूर रोडवर लोहगावे यांची शेती असून गुरुवारी सकाळी ४० ते ४५ वर्षे वय असलेला एका अज्ञात व्यक्ती शेतात दिसुन आले . या घटनेची माहिती परमेश्वर लोहगावे यांनी रामतीर्थ पोलिसांना फोन करुन कळवली. सदरची व्यक्ती मयत असून चेहरा रक्ताने माखला असल्याने चेहरा ओळखू येत नाही. या अज्ञात व्यक्तीचा खुन करुन मृतदेह लोहगावे यांच्या शेतात फेकून दिला असावा अशी चर्चा होत आहे. घटनेची माहिती कळवल्यानंतर गांभीर्य ओळखून रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे हे घटनास्थळी दाखल झाले.. श्र्वान व ठसे तज्ञांन पाचारण केले .होते कसल्या प्रकारचा सुगावा लागु शकला नाही .सदर मयताची ओळख व मृत्यु कसा झाला हे शोधण्याचे आवाहन रामतीर्थ पोलीसा पुढे उभे राहीले आहे .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा