पानगाव येथील रेणुका माता मंदिराच्या विकासासाठी 25 लक्ष रुपयाचा निधी देण्याची घोषणा केली
शिवशाही वृत्तसेवा , जिल्हा प्रतिनिधी पानगाव उदयकूमार पाठक
पानगाव येथील रेणुका माता मंदिराच्या विकासासाठी 25 लक्ष रुपयाचा निधी देण्याची घोषणा करून संत माधव मामा ज्ञानेश्वरी मंदिर (मठ) विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांनी दोन्ही ठिकाणी भेटी दरम्यान दिली.
पानगाव येथे रेणुका माता मंदिरास येणाऱ्या भाविकाची वाढती संख्या लक्षात घेऊन या परिसराच्या विकास कामासाठी 25 लक्ष रुपयाचा निधी देण्यात येईल त्यापैकी 15 लक्ष रुपयाचे काम दसऱ्यापूर्वी सुरू करावे उर्वरित दहा लक्ष रुपये येत्या मार्च नंतर देण्यात येतील असे आ रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.
संत माधव मामा ज्ञानेश्वरी मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी अपेक्षा प्रभाकर गिरी महाराज यांनी व्यक्त केली असता आ रमेशआप्पा कराड यांनी विकास कामाचा प्रस्ताव तयार करा निश्चितपणे लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ असे बोलून दाखविले.
आ कराड यांनी पानगाव येथील संत माधव मामा ज्ञानेश्वरी मंदिर आणि रेणुका माता मंदिर येथे भेट देऊन विकास कामाबाबत चर्चा केली दोन्ही ठिकाणी आ कराड यांचे मंदिर ट्रस्टच्या वतीने यथोचित सत्कार करून स्वागत करण्यात आले..
यावेळी भाजपाचे विक्रमकाका शिंदे, अँड अरुण चव्हाण, अनिल भिसे, दशरथ सरवदे, सतीश आंबेकर, सुकेश भंडारे, वसंत करमुडे, अनंत चव्हाण, बालाजी महाराज गिरी, व्यंकटी महाराज फावडेवाडीकर, भागवत गीते, अमर चव्हाण, गोपाळ शेंडगे, दत्तात्र्य भंडारे, वामन संपत्ते, हरिकृष्ण गुरले, गणेश तूरूप दत्ता आंबेकर प्रकाश गालफाडे भागवत गडगिळे अँड माधव गुडे गोविंद नरहरे दिगंबर येडले संतोष तूरूप, मारुती गालफाडे, शीला आचार्य, योगीराज शिरसाट, वीरेंद्र चव्हाण, अँड. बोराडे नाथराव गीते प्रसाद गीते, शिवाजी जाधव, उद्धव बरुळे, अँड किशोर श्रीगिरे, रमेश केंद्रे, राजू भंडारे यांच्यासह मंदिर ट्रस्टचे सदस्य, नागरिक, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा