पं.शौनक अभिषेकी यांची अखंड २३ वर्षे रुक्मिणी माते चरणी गायनसेवा
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सव सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संगीत महोत्सवात पं.शौनक अभिषेकी आणि श्री.ओम बोंगाणे यांच्या अभिजात शास्त्रीय गायनाला पंढरपूरकर कलारसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
सुरुवातीला तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, सदस्य श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, पं.शौनक अभिषेकी, श्री.ओम बोंगाणे, यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली
राग प्रताप वाडी विलंबित रुपक मध्ये व नंतर एकतालातील बंदिशी, पद्मश्री पं.जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेल्या संतरचना, अबीर गुलाल, संत भार पंढरीत, शब्दात वाचून कळले सारे, आदी रचना गाऊन शौनक अभिषेकी यांनी अभिजात शास्त्रीय संगीताची मेजवानी पंढरपूर कला रसिकांना दिली. त्यांना तितकिच समर्पक साथसंगत तबला सुभाष कामत, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनियम माधव लिमये, टाळ शिवराज पंडीत, यांनी केली.
द्वितीय सत्रात उस्ताद रशीद खान यांचे शिष्य ओम बोंगाणे यांच्या गायनाला सुरुवात झाली. त्यांनीही वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र जय जय राम कृष्ण हरी ने वातावरण भक्तिमय करत, रुप पाहता लोचनी, सदा माझे डोळा, सुखाचे जे सुख, असे अनेक अभंग गाऊन भक्तीरसाचा अद्वितीय आनंद दिला. त्यांना तबला कौस्तुभ तळेकर, पखवाज विकास कोकतरे, हार्मोनियम अथर्व देव आणि शिष्यांनी स्वरसाथ केली. संगीत महोत्सवाची रंगत अधिकाधिक वाढत असताना संगीत कलारसिकांची उपस्थिती मोठी उपस्थिती होती. सर्वजण मंदिर समितीचे भरभरून कौतुक करत असल्याचे दिसत आहेत. ध्वनीव्यवस्था आरती स्पीकर भैय्या मनमाडकर यांनी सुंदर केली होती. संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी वर्ग अथक परिश्रम घेत आहेत. पुढील चारीही दिवस असाच भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन मंदिर समितीचे वतीने करण्यात येत आहे.
राहुल गोडसे सतिश चव्हाण
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा