चौथ्या माळेला रेणूका गडावर भाविकांची दर्शनासाठी केली गर्दी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
श्री रेणुकामाता मंदिरात चौथ्या माळेला रेणूका भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. विश्वस्त चंद्रकांत भोपी व विनायक फांदाडे यांनी नित्याप्रमाणे 'श्री' ला शेंदूर लेपन करून अभिषेक केला. यावेळी विश्वस्त संजय काण्णव,अरविंद देव,दुर्गादास भोपी, आशीष जोशी व दुर्गादास भोपी यांची उपस्थिती होती. तद्नंतर छबिना काढून परिसर देवता पूजन करून मातेला महाप्रसाद चढविण्यात आला.
यावर्षी मंदिर व्यवस्थापन समिती व स्थानिक प्रशासनाने व्यवस्थित नियोजन केल्याने भाविकांना सुलभ व आल्हादादायक वातावरणात मातेचे दर्शन घडत आहे.
माहूर गडावर भाविक रोज सकाळी 5 वाजता पासून गर्दी होत असते पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो दर्शन अत्यंत शिस्तबध पद्धतीने भाविक घेतात माहूर ची रेणुका माता ही साडे तीन शक्ती पिठा पैकी एक पूर्ण पीठ आहे त्या मुळे दर्शना करिता बाहेर राज्यातूनच नव्हे परदेशातून भाविक येतात नवरात्री चे नव दिवस विविध संस्कृतिक कार्यक्रम होतात.
त्या पैकी एक म्हणजे कन्या पूजा. विश्वस्त अरविंद देव यांचे हस्ते आजचे कन्या पूजन संपन्न झाले. खुशी खापर्डे रा. माहूर व लावण्या सुतार रा. जळगाव या बालिकांचे कन्या पूजन झाले. यवतमाळ येथील संगीत विशारद पंडित ज्ञानेश्वर बालपांडे यांनी गायनरुपी सेवा मातेचरणी अर्पण केली. त्यांना तबलावादक ओमप्रकाश गवई,स्वरा ओमप्रकाश गवई, माला गवई, हर्षदीप पाईकराव, अक्षरा शिंदे, गुलाब भोयर, शुभम गुंजकर, रोहन कदम, रुद्र भारती, परमेश्वर काळे, आकाश जाधव, भगवान कदम व पुरोषोत्तम भारती यांनी साथसंगत केली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा