प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
म्हसने सुलतानपूर या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे 13 वे वर्ष असून मोठ्या उत्साहात कार्यक्रम चालू आहेत. या ठिकाणी नियोजित वेळेप्रमाणे देवीची महाआरती विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ.सौ.गीतांजली, डॉ. सुदाम बागल, सौ. स्वप्नाली, श्री. सतीश भालेकर, सौ. शितल, श्री. श्रीकांत जगताप, सौ.शुभांगी, श्री संतोष तरटे मेजर, सौ.सुरेखा, श्री.संजय लाकूडतोडे पाटील, सौ. पुष्पा, श्री. हरिभाऊ दळवी, सौ. पुष्पलता, श्री प्रवीण शेठ ओस्तवाल, सौ. डॉ.छाया, डॉ. श्री. विलास काळे, सौ. सुवर्णा, श्री. मच्छिंद्र तरटे, सौ. कल्पना, श्री. सुरेश पठारे आदी मान्यवर महाआरतीचे मानकरी ठरले आहेत. तसेच वकृत्व स्पर्धा व दांडिया, डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा,पोवाडा, होम मिनिस्टर, किर्तन, तसेच विजेत्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दिनांक 24 रोजी मूर्ती विसर्जन कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती म्हसने सुलतानपूर फ्रेंड प्रतिष्ठान तसेच ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा