आयुष्यमान भारत आभा कार्ड कॅंम्प साठी नागरिकांची गर्दी
![]() |
भाजपच्या वतीने मोफत आयुष्यमान भारत व आभा कार्ड कॅंम्पचे आयोजन छाया - शरद रसाळ, सुपा |
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील भैरवनाथ सभामंडपात भाजप प्रदेश कर्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस सागर मैड यांच्या वतीने मोफत आयुष्यमान भारत व आभा कार्ड कॅंम्पचे मंगळवार दि. १७ रोजी सकाळी १० ते ३ यावेळी आयोजन करण्यात आले.
अल्प कागदपत्रांसह या योजनेत सहभागी होता येत असल्याने जेष्ठ नागरिक, महिला, तरूण यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. मात्र रेशनकार्ड व आधार कार्ड ऑनलाईन न झाल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. शासकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी व सेवा सोसायटी मार्फत स्वस्त धान्य मिळावे यासाठी सेवा सोसायटीचे चेअरमन व चालक यांच्याकडून सहा महिन्यांपूर्वी ऑनलाईन दुरूस्ती साठी प्रत्येक नागरिकांचे रेशनकार्ड झेरॉक्स, आधार कार्ड नंबर, फोन नंबर, पासपोर्ट फोटो आदी कागदपत्रे सादर करण्यात आली. मात्र तहसील व पुरवठा विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सन २०२१ नंतरच्या ऑनलाईन नोंदी दिसत आहेत परंतु नावात चुका, अपुर्ण नाव यासह असंख्य चुका असल्याने या योजनेसाठी सुमारे सत्तर टक्के ग्रामस्थांना वंचित राहावे लागत आहे.
दरम्यान यावेळी भाजप युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस सागर मैड यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या अडिअडचणी समजून घेतल्या. यावेळी माजी चेअरमन भैय्यासाहेब रसाळ, माजी उपसरपंच संजय पवार, शिवाजी रसाळ, मधुकर लगड, शिवाजी कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र भोगाडे, पांडुरंग लोणारे, गणेश डोंगरे, तात्यासाहेब गांगड, दिलीप भोगाडे, ग्रामविकास अधिकारी सचिन थोरात यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारनेर तहसीलला पाठपुरावा करणारभारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, नेते अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आयुष्यमान भारत व आभा कार्ड काढण्यासाठी मोफत कॅंम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र तहसील व पुरवठा विभागाकडून ऑनलाईन साठी काही तृटी आहेत त्या दुरूस्त करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.सागर मैडभाजप तालुका सरचिटणीस युवा मोर्चा
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा