maharashtra day, workers day, shivshahi news,

कंटेनरची धडक झाल्याने ट्रकने घेतला पेट - चारजण होरपळून मृत्यूमुखी

पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात
Terrible accident on Navale Bridge in Pune , pune , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पुणे (जिल्हा प्रतिनिधी अभिषेक जाधव)
पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा जीवघेणा अपघात झाला आहे. कंटेनरची धडक झाल्याने ट्रकने पेट घेतला आणि त्याला आग लागली. या आगीत ट्रकच्या केबीनमध्ये बसून प्रवास करणारे चारजण होरपळून मृत्यूमुखी पडलेत.
तर इतर जखमी झालेत. ही आग विझवण्या पु त अग्नीशमन दलाला यश आलं आहे.
पुण्यातील नवले पुलावर अपघाताचं सत्र  सुरूच असून पुन्हा एकदा जीवघेणा अपघात झाला आहे. 


 हा अपघात नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. मक्याचा भुसा घेऊन साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ आला असता, ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कंटेनर रस्त्यावरच उलटला. मात्र धडक मोठी बसल्याने ट्रकला क्षणातच आग लागली. यात ट्रकच्या केबिन मध्ये बसलेले चार जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून मृतदेह बाहेर काढले.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !