maharashtra day, workers day, shivshahi news,

फसव्या जाहिरातीवरून पंतप्रधान मोदीसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या फोटोला फासला रंग

मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात मराठा समाज आक्रमक
Maratha community aggressive for Maratha reservation , mangalwedha , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी राज सारवडे)
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये काल मंगळवेढ्यातील सकल मराठा बांधवांच्या भावना आरक्षणासाठी तीव्र झाल्या एसटीवरील फसव्या जाहिरातीला कलर फासून निषेध व्यक्त केला.

सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावे, यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने दामाजी चौकात सुरू असलेला साखळी उपोषणाचा लढा अधिक तीव्र झाला.याअगोदर सरकारला ४० दिवसाची मुदत दिलेली असताना देखील शासनाने दिलेला शब्द पाळला नाही. यासाठी पुन्हा एकदा शांततेच्या मार्गानेच लढ्यासाठी मराठा समाजाने कंबर कसली आहे.


बुधवारपासून मंगळवेढा शहरात नियोजित केलेल्या रूपरेषेनुसार साखळी उपोषणात सकाळी १० ते २ व दुपारी २ ते सायं ६ या वेळेत शहरातील प्रत्येक गल्लीतील मराठा बांधव आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आंदोलनात सहभागी झाले.शासनाच्या आरक्षण देण्याच्या उदासिनतेबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी शहरात व गावागावांत कॅन्डल मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. एसटीवर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजने संदर्भातील जाहिरात असलेले एसटी दामाजी चौकातच बंद पडली.

त्या गाडीला धक्का देत केंद्र व राज्य सरकारच्या सत्ता राजकीय सत्ताधाऱ्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून आपले फोटो लावून, विकासाच्या नावाखाली स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले आणि फसव्या जाहिरातीमधून समाजबांधवांची फसवणूक झाल्यावरूनपंतप्रधान नरेद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या जाहीरातीवरील फोटोला रंग फासून निषेध व्यक्त केला. जाहिरातीमधील फोटोवर कलर फासला. दरम्यान माचणूर व रहाटेवाडी या ग्रामपंचायतीने मराठा आरक्षणासाठी ठराव करण्यात आले.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !