महिला बचत गटांना सक्षम व स्पर्धात्मक बनविण्याच्या प्रयत्न
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव यांच्या अथक प्रयत्नातून महिला बचत गटांना सक्षम व स्पर्धात्मक बनविण्याच्या अनुषंगाने मेहकर शहरातील पोलिस स्टेशन जवळ तालुकास्तरीय विक्री केंद्राचे भूमिपूजन शिवसेना नेते खासदार प्रतापरावजी जाधव व आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, शिवसेना ता. प्रमुख सुरेश वाळुकर, शहरप्रमुख जयचंद बाढीया, नायब तहसिलदार अजय पिंपरकर, उपविभागीय बांधकाम विगाचे गुलाब शेळके, शिवसेना महिला आघाडीच्या सौ.दांदडे ताई, सौ.वैशाली सावजी, संरपच संघटनेचे अध्यक्ष अरुण दळवी, युवासेना ता.प्रमुख भूषण घोडे, बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती निर्मला देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळ लोक संचालित साधन केंद्र व्यवस्थापक सौ.जया ढोरे, उमेद अभियान व्यवस्थापक कायंदे, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान प्रकल्प व्यवस्थापक रमेश उत्पुरे, लेखापाल राहुल चोपडे व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, बचत गटाच्या अधिकारी वर्ग उपस्थित होते.
#Shivsena #Buldana #शिवसेना
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा