maharashtra day, workers day, shivshahi news,

रेणापूर तालुका भाजपा नूतन पदाधिकाऱ्यांना आमदार रमेश कराड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

भाजयुमो तालुकाध्यक्ष अमर चव्हाण तर रेणापूर शहर अध्यक्ष अच्युत कातळे
     
MLA Ramesh Karad , Taluka President Amar Chavan , Renapur City President Achyut Katle , latur , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, लातूर (जिल्हा प्रतिनिधी उदयकुमार पाठक)
भारतीय जनता पार्टीच्या रेणापूर तालुका नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना भाजपानेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे लातूर येथील भाजपा संवाद कार्यालयात वाटप करण्यात आले. येणारा काळ निवडणुकीचा असून नवनिर्वाचित भाजपा पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी पक्षाचे कार्य जिद्दीने आणि जबाबदारीने करुन पक्ष संघटन मजबूत करावे असे आवाहन आ. रमेशअप्पा कराड यांनी यावेळी केले.
        रेणापूर तालुका भाजपा अध्यक्ष अ‍ॅड. दशरथ सरवदे यांनी तालुका कार्यकारिणी जाहीर केली असून १७ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १५ चिटणीस, १३ निमंत्रीत सदस्य आणि ४२ कार्यकारिणी सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकान्यांना शनिवार ७ आक्टोबर रोजी भाजपनेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे लातूर येथील भाजपा संवाद कार्यालयात वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस महेंद्र गोडभरले, लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दशरथ सरवदे, संगायो समिती अध्यक्ष वसंत करमुडे, माजी उपसभापती अनंत चव्हाण, डॉ. बाबासाहेब घुले, यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.



          रेणापूर तालुका हा लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वातील भाजपाचा बालेकिल्ला आहे. पक्ष संघटन मजबूत असून येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत पक्षाचे मताधिक्य वाढविण्यासाठी प्रत्येकांनी कार्यरत राहावे असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या आणि पक्ष नेतृत्वाच्या माध्यमातून तालुक्यातील गावागावात, वाडीवस्तीत विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेचा अनेकांना लाभ मिळालेला आहे. तेंव्हा याबाबत कार्यकर्त्यांनी चर्चा घडवून आणावी पक्षाचे काम वाढवावे मिळालेले पद हे मोठी जबाबदारी आहे असे बोलून दाखविले. प्रारंभी तालुकाध्यक्ष अ‍ॅड, दशरथ सरवदे यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत कातळे यांनी केले.
          रेणापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या विविध आघाडी आणि मोर्चा नूतन पदाधिकारी युवा मोर्चा अध्यक्ष अमर चव्हाण, उपाध्यक्ष पंकज काळे, चंद्रकांत माने, महिला आघाडी अध्यक्षा अनुसया फड, किसान मोर्चा अध्यक्ष जयप्रकाश जटाळ, उपाध्यक्ष पृथ्वीराज उरगुंडे, दलित आघाडी अध्यक्ष सुभाष पवार, ओबीसी आघाडी अध्यक्ष विठ्ठल कसपटे, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष जलील शेख, सहकार आघाडी अध्यक्ष डॉ. महेंद्र पिंपळे, व्यापारी आघाडी अध्यक्ष नितीन अढळकर, जेष्ठ कार्यकर्ता सेल संयोजक भाऊराव घुगे, रेणापूर शहर भाजपा अध्यक्ष अच्युत कातळे, रेणापूर शहर भाजयुमो अध्यक्ष संतोष राठोड, खरोळा शहर अध्यक्ष हणमंत राऊतराव.



        
  रेणापूर तालुका भाजपा उपाध्यक्ष नामदेव बोंबडे, गोपाळ शेंडगे, राजू हाके, सिकंदर शेख, उत्तम चव्हाण, किशन क्षिरसागर, मच्छिंद्र चक्रे, राजकुमार आलापुरे, भागवत गित्ते, दत्तात्रय जोगदंड, सुनिल चेवले, इब्राहीम सय्यद, लक्ष्मण खलंग्रे, शिला आचार्य, अनिता राऊतराव, छाया जोगदंड, उमा सुर्यवंशी, सरचिटणीस सुकेश भंडारे, माधव घुले, श्रीकृष्ण पवार, राजकुमार मानमोडे, भाऊसाहेब गुळभिले, संतोष चव्हाण, चिटणीस अॅड. रमेश खाटप, शिवमुता उरगुंडे, सुनिल सुर्यवंशी, राहूल माने, बळवंत कराड, तुकाराम केंचे, संजय डोंगरे, बालाजी खरोळे, सचिन हालकुडे, दत्ता सरवदे, रमेश कटके, भिमराव मुंडे, महानंदा दरेकर, बायनाबाई साळवे, संगिता सातपुते, कोषाध्यक्ष सतिष कुलकर्णी, कार्यालय प्रमुख गणेश तुरूप.


   
रेणापूर तालुका भाजपा कार्यकारिणीत निमंत्रीत सदस्य श्रीकृष्ण जाधव, रमाकांत फुलारी, सुरेश बुड्डे, ज्ञानोबा भिसे, अनंत चव्हाण, ओमकारअप्पा क्षिरसागर, विजय गंभिरे, सुरेंद्र गोडभरले, विजय चव्हाण, दिनकर राठोड, अभिषेक आकनगिरे, वाजीद पठाण, प्रकाश रेड्डी, कार्यकार्यकारिणी सदस्य श्रीमंत नागरगोजे, शिवाजी उपाडे, शिवाजी जाधव, रघुनाथ पुंडकरे, शिवाजी सोमवंशी, नवनाथ रांजणे, बालाजी केंद्रे. नारायण राठोड, प्रकाश जाधव, बाजीराव साखरे, भालचंद्र सुर्यवंशी, अविनाश बोराडे, गोविंदराव देशमुख, सुंदर घुले, विलास केदार, पाटलोबा मुंडे, मारूती गालफाडे, अंबादास राठोड, अनिल येलगटे, बाबुराव कस्तुरे, संध्या श्रीकृष्ण पवार, अमृता मंगेश पाटील, राधा अभिमान लहाडे, रेशमा नामदेव भंडारे, सुमन ज्ञानोबा फड, उज्वला संतोष स्वामी, लक्ष्मीबाई बोळंगे, कल्पना राम मस्के, रंजना मारूती गालफाडे, ज्योती पंडीत लांबुटे, संजिवनी सुभाष नवगिरे, सविता संतोष घुगे, सुमन श्रीकृष्ण मोटेगावकर, मनिषा माधव बोराडे, दत्ता मुंडे, शालीकराव गोडभरले, बालासाहेब बरीदे, संपत कराड, राज जाधव, सुभाष रायनुळे, सुनिल बुड्डे आदींचा समावेश आहे.
          नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमात रेणापूर तालुक्यातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी वाजीद सय्यद यांनी आपल्या सहकार्यासह आ. रमेशअप्पा कराड यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !