बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
दोन वर्ष बंद असलेला फॅबटेक शुगर खरेदी केल्यानंतर कामगारांच्या सहकार्याने गेल्या वर्षी दोन महिन्यांमध्ये सर्व यंत्रसामग्री उभारून आवताडे शुगर या नावाने कारखाना सुरू केला पहिल्याच गळीत हंगामामध्ये 4 लाख 3 हजार मॅट्रिक टन उसाचे गाळप करून खाजगी कारखानदारीमध्ये सर्वाधिक दर देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे समाधान केले यंदाही आवताडे शुगर हा इतर कारखान्यांपेक्षा जादा दर देऊन ना नफा ना तोटा या तत्त्वावर केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना चालवणार असून साडेपाच ते सहा लाख मॅट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी बॉयलर अग्निप्रदीपण शुभारंभ प्रसंगी दिली.
प्रारंभी बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्याअगोदर सात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा व होमहवन करण्यात आले
यावेळी पुढे बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की गेल्या वर्षी अचानक कारखाना सुरू केला, कोणतेही यंत्रणा कारखान्याने भरली नसतानाही इतर कारखान्यांकडून सहकार्य घेऊन गळीत हंगाम पार पाडला सध्या कारखान्यावर सहाशे कर्मचारी काम करत आहेत मात्र येत्या वर्ष ते दीड वर्षाच्या काळात ही संख्या हजार ते साडेबाराशे च्या आसपास नेणार असून कारखान्याची क्षमता वाढवणार आहे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार असून उजनी मध्ये असणाऱ्या आपल्या हक्काच्या पाण्याच्या पाळ्या आपण घेणारच आहोत, म्हैसाळचे पाणी सर्व गावांना नियमाप्रमाणे मिळणार आहे मागील पंधरवड्यात थोडासा पाऊस झाल्यामुळे चारा टंचाईची मागणी कमी झाली होती मात्र आता पाऊस लांबल्याने चारा टंचाई जाणवत आहे.
त्यासाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत टेंभू योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यातील मान नदीमध्ये येणे अशक्य आहे असे अनेक जण म्हणत होते मात्र मी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे टेंभूचे पाणी मान नदीत आणण्याचा हा ऐतिहासिक क्षण नदीकाठच्या लोकांनी अनुभवला आहे. यापुढे या भागात पाण्याची कमतरता भासू देणार नाही मंगळवेढा हा दुष्काळी तालुका आहे म्हणून लागलेला कलंक पुसून या मंगळवेढ्याच्या काळ्या आईला हिरवा शालू नेसवून तालुका सुजलाम सुफलाम करण्याचे माझे ध्येय आहे अवताडे शुगर हा यावेळी शेतकऱ्यांना समाधानकारक दर तर देणारच आहे मात्र त्यामध्येही जे शेतकरी उशिरा कारखान्याला ऊस घालतील त्यांना जाहीर दरापेक्षाही जादा दर देण्याचा आमचा विचार असून त्यावरही लवकरच निर्णय घेणार असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले यावेळी बोलताना त्यांनी आवर्जून मी टीका करणाऱ्यांना उत्तर देत बसणाऱ्यातील नाही तर काम करून टीकाकारांची तोंड बंद करणारातील आमदार आहे असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
यावेळी प्रास्ताविकात बोलताना आवताडे शुगरचे कार्यकारी संचालक मोहन पिसे म्हणाले की गेल्या वर्षी कारखाना सुरू करण्यासाठी कमी कालावधी मिळाला असतानाही 4,03,765 मॅट्रिक टन उसाचे गाळप केले फक्त 119 दिवस कारखाना चालला यामध्ये 3,88,500 पोती साखर उत्पादन झाले असून 9.62% रिकवरी मिळाली होती एफ आर पी नुसार 2007 रुपये हा दर निश्चित होता तरीही कारखान्याचे चेअरमन संजय अवताडे व मार्गदर्शक समाधान आवताडे यांनी 342 रुपये ज्यादा दर देत एक रकमी 2350 रुपये दर दिला त्यामुळे यंदाही उसाला चांगला दर देण्यात येणार असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अवताडे शुगरला ऊस घालून सहकार्य करावे अशी विनंती कार्यकारी संचालक मोहन पिसे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केली.
यावेळी कारखान्याचे सरव्यवस्थापक सुहास शिंनगारे यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी कारखाना स्थळावर प्रहार चे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, खंडू खंडारे, मिलिंद आटकळे, डीसी जाधव, रावसाहेब राजमाने, सुधाकर फटे, आण्णासाहेब फटे, विष्णू बागल, सचिन हुंडेकरी, गंगाधर काकनकी, बादल सिंह ठाकुर, धीरज म्हमाणे, संदीप पाटील, भीमराव भुसे, सुरेश भाकरे, राजाभाऊ घायाळ, विवेक खिलारे, बापू मेटकरी, किशोर जाधव, तात्या जगताप, नितीन करंडे, दत्तात्रय शिंदे, अविनाश मोरे, नारायण शिंदे, श्याम पवार, आवताडे स्पिनरचे इन्चार्ज सुनील कमते, चिफ केमिस्ट मोहन पवार, आसवनी प्रमुख संभाजी फाळके, चिफ अकौंटट बजीरंग जाधव, शेती अधिकारी राहुल नागणे, उप शेती अधिकारी तोहीद शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, प्रताप मोरे, सोमनाथ धावणे, मनोज होलम, अभिजित पवार,निलेश रणदिवे, चंद्रकांत राठोड, रणजीत पवार, ज्ञानेश्वर बळवंतराव, यांचे सह अधिकारी, कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा