पळवे खुर्द येथे सत्कार समारंभ सोहळा
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
अहमदनगर जिल्हा परिषदेचे जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पळवे खुर्द येथे सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित या सत्कार समारंभाला अहमदनगर जिल्हा दूध संघाचे माजी संचालक शशिकांत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडीलकर, सुपा गावचे माजी उपसरपंच दत्ता पवार, कडूस गावचे सरपंच मनोज मुंगसे, माजी चेअरमन वसंतराव देशमुख, रोहिदास नवले, गजाराम तरटे, उपसरपंच अमोल जाधव, नवनाथ पाचारणे, बाळू जाधव, राजेंद्र पाचारणे, दादा पाचारणे (सर),
माजी सरपंच नानाभाऊ गाडीलकर, सेवा सोसायटी संचालक रमेश शेळके, अजय गाडीलकर, हरिभाऊ भंडलकर, ग्रामपंचायत सदस्य सुदाम इरकर, पोपटराव तरटे, दत्तात्रय जगताप, शिवाजीराव नवले, पोपटराव गाडीलकर, नामदेव जराड, स्वानंद डेअरीचे विक्रांत देशमुख, राजेश देशमुख, बापूराजे देशमुख, संपतराव कुटे, सचिन देशमुख, भाग्येश देशमुख, पोपटराव पाचारणे, नितीन गुंड, उद्योजक स्वप्निल कळमकर, पोपटराव पाचारणे, शब्बीर भाई तांबोळी, रावसाहेब शिंदे, युवराज जगताप, आमिर तांबोळी, पै.अमोल सोनुले, वैभव तरटे, बाबुराव शिंदे,संतोष भंडलकर, राजेंद्र गायकवाड, संदीप जगताप, कृष्णा शेलार व ग्रामस्थ उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात समाजोपयोगी काम करत असून ते घराघरात पोचवण्यासाठी मी प्रयत्न करून येत्या निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी परिश्रम करणार असल्याचे राहुल शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा