अध्यक्ष पदी हाणमंत पाटील कदम तर उपाध्यक्ष पदी नागोराव पाटील साळूंके यांची निवड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील मौजे दुगाव येथील जिल्ह्य परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली.
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी हाणमंत पा.कदम तर उपाध्यक्षपदी नागोराव पा.साळूंके यांची निवड करण्यात आली.
तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य पदी अनुसया शिंदे,अर्चना जाधव,जयश्री पुय्यड,लक्ष्मण नांगरे,व्यंकटराव पाटील जाधव,बालाजी साळुंके,उनकेशवर पाटील खैरगावे,आंनदा शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी जिल्ह्य परिषद केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक तोगलवार ,व शाळेतील शिक्षक व बिट जमदार निकम व शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक तसेच गावातील नागरीक उपस्थित होते बिनविरोध निवड करण्यात आलेल्या अध्यक्ष,उपाध्यक्ष व समितीच्या सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा