महाविद्यालयाच्या वतीने यशस्वी संघाचे कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
दुसरबीड स्थानिक नारायणराव नागरे महाविद्यालयमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार तोतारामजी कायंदे यांच्या शुभहस्ते झाले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ स्तरीय महिला कबड्डी स्पर्धेमध्ये यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 48 चमू सहभागी झाले होते. अंतिम सामना धाबेकर महाविद्यालय कारंजा व पटेल महाविद्यालय पिंपळगाव काळे यांच्यामध्ये झाला.
प्रथम पारितोषिक धाबेकर महाविद्यालय कारंजा या चमुला मिळाले व द्वितीय पारितोषिक पटेल महाविद्यालय पिंपळगाव काळे या महाविद्यालयाने पटकावले व तिसरे सेमी फायनलचे बक्षीस गो.से. महाविद्यालय खामगाव या संघाला मिळाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर विजय नागरे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये सांगितले की नारायणराव नागरे महाविद्यालयाच्या दृष्टीने 33 वर्षांमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच या स्पर्धा आयोजन करण्याचा मान मिळाला त्याबद्दल आम्ही विद्यापीठाचे खूप आभारी आहोत व आमच्यासाठी ही खूप आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
आमचे महाविद्यालय आणि विद्यापीठाचे अंतर 250 किलोमिटर त्यात दुसरबीड हे गाव ग्रामीण भागामध्ये असूनअशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करणे व मुलींची राहण्याची जेवणाची व्यवस्था करणे ही खूप मोठी जोखीम आम्ही आमचे सचिव शिवराजभाऊ कायंदे यांच्या सहकार्यातून पत्करून आमच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक प्रा सर्जेराव वाघ व सर्वच कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली व विद्यापीठाने आमच्यावर विश्वास दाखवला हे आमच्यासाठी खूप महत्त्वाची अभिमानाची बाब आहे असे त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये भावना व्यक्त केल्या.
यावेळी भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसचिव डॉ शिल्पाताई कायंदे यांच्या हस्ते प्रथम द्वितीय व तृतीय पक्षिसांचे वितरण करण्यात आले यावेळी विजेता संघाचे कोच डॉ राहुल रडके व उपविजेता संघाचे कोच प्रा डॉ सांगळे सेमी फायनल मध्ये विजेता संघ प्रा सौ बोचे पंच श्री उद्धव नागरे श्री घुगे प्रा हुंबड श्री चोरमारे श्री भोसले श्री पी पी नागरे मलकापूर आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक किनगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग श्री रमेश कोंढाणे यांनी केले त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने शाल शिरफळ व पुष्प देऊन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ विजय नागरे यांनी सत्कार केला.
यावेळी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ दीपक देशमाने डॉ गणेश घुगे , प्रा. मिलिंद गवई , प्रा शेख इनुस , प्रा नयना गवारे, प्रा महेश कायंदे, प्रा सत्यम श्रीवास्तव, प्रा गजानन राठोड , प्रा. शिंदे, विशेष करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये पडद्याच्या पाठीमागील श्री अनिल रणमळे, श्री गजानन मुंडे, श्री अनिल गायकवाड , धीरज गुंजाळ, श्री बाळू पंढरे, श्री नरेंद्र गवई, सौ सुरेखा राहुल मोरे ,यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले या स्पर्धा बघण्यासाठी मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी व परिसरातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा