maharashtra day, workers day, shivshahi news,

ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षणाबाबत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी

ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाशअण्णा शेंडगे यांचे आवाहन
Opposition to giving reservation to Maratha community from OBC ,Prakashanna Shendge ,nanded, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)

मुंबई : आम्ही आजही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या विरोधात आहोत.आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमचीही मागणी आहे.ते आमचे मोठे भाऊ आहेत मात्र त्यांना सरकारने वेगळे आरक्षण द्यावे. असे म्हणत ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे यांनी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षणाबाबत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि  उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावे असे आवाहन आज शनिवार ता.9 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात केले.
यावेळी त्यांच्या सोबत ओबीसी जनमोर्चा , ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी., बलुतेदार अलुतेदार संघटना, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाशअण्णा शेंडगे तसेच दशरथ पाटील उपस्थित होते.


प्रकाश अण्णा शेंडगे पुढे म्हणाले कि, "पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर  एक तरी नगरसेवक होईल का ? जर आपण ओबीसी मध्ये सरसकट दाखले देत असाल तर ओबीसी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही.बारा तारखेला राज्यव्यापी बैठक  मुंबईमध्ये आहे आम्ही मराठा बांधवांसोबत आहोत.मराठा समाजाने संविधान प्रक्रिया राबवावी.मराठी समाजाची भूमिका ओबीसीला मान्य नाही.मराठा उपोषणकर्ते  मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे अशी आमची विनंती आहे".

ते पुढे म्हणाले की, जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटे (ता. अंबड) या गावी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्त्यांचे उपोषण चालू आहे. मराठा समाजासाठी सरकारने रात्री 11 वाजता जीआर काढला.परंतु मनोज जरांगे पाटील हे मात्र सरकारला वेळ द्यायला तयार नाहीत.


मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये.ते दिल्यास ओबीसी गरीब लोकांना न्याय मिळणार नाही. देवेंद्र फडवणीस यांनी देखील सांगितले होते की ,ओबीसी मधून वाटेकरी होऊ देणार नाही .तसेच अजित पवार ,उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितले होते .अजित पवार तसेच फडणवीस तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करावी .पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर एक तर नगरसेवक होईल का ? जर आपण ओबीसी मध्ये सरसकट दाखले देत असाल तर ओबीसी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही.

बारा तारखेला राज्य राज्यव्यापी बैठक  मुंबईमध्ये आहे आम्ही मराठी सोबत आहोत. मराठा समाजाने संविधान प्रक्रिया राबवावी .मराठी समाजाची भूमिका ओबीसीला मान्य नाही.जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे  अशी आमची विनंती आहे .



मराठा समाजाला 10 टक्के ईडब्लूएस आरक्षण दिलेले आहे.सरकारने आमची भाकरी हिसकावून घेऊ नये ? धनगर धनगर एकच आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने जनगणना करावी आणि सर्व आरक्षण द्यावे ही जनगण झाली नाही तर बारा तारखेला बैठकीमध्ये सरकारच्या विरोधात निर्णय घेऊ असे हि पुढे म्हणाले. 
सरकारने मराठा समाजासाठी ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी जीआर काढला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्या शिवाय होणार नाही .राजकीय फायदा कोणी घेऊ नये.लाठीचार्ज चार्जचा आदेश जो काढला होता अजून तो अधिकारी सापडत नाही.कायदेशीर मार्गाने आरक्षण घ्यावे आणि उपोषण मागे घ्यावे.ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आहे म्हणून आम्ही ओबीसी समाज विरोध करत आहे.आता आंदोलना  शिवाय आम्हाला पर्याय नाही त्यामुळे राज्य सरकारवर विश्वास नाही. येणा-या निवडणूक मध्ये आम्ही मतदान करणार नाही. फडणवीस सरकारने आमच्याशी  चर्चा करावी अन्यथा सरकारच्या विरोधविरोधात भूमिका घ्यावी लागणार आहे.




दशरथ दादा पाटील यांनी यावेळी सर्व महाराष्ट्रातील आगरी समाज आहे.त्यांची साथ आम्हांला आहे.सर्व समाज एकत्र झालेले आहे.मराठा समाज ओबीसी मध्ये येऊ शकत नाही असा अहवाल देखील सादर करण्यात आलेला आहे.त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना विनंती केली की तुम्ही विचार करून चर्चा करावी 10% टक्के इवीएस मध्ये आरक्षण आहे. त्यामध्ये 5% टक्के आरक्षण वाढवून देण्यात यावे.आमचा  मराठा आरक्षणाला विरोध नाही.परंतु ओबीसी मधून आरक्षण देऊ नये.

आम्ही आंदोलन शांततेनी करू जर ओबीसीची जनगणना झाली तर ओबीसीची जाती निहाय 62% जनगणना होईल असे दशरथ दादा पाटील यांनी म्हटले.



राज्य सरकारने आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास व ओबीसी मधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तो ओबीसींवर अन्याय होईल. अर्थात मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही.त्यांना खुल्या गटातून ईडब्ल्यूएस चे आरक्षण मिळालेच आहे.ते वाढवावे किंवा आवश्यक वाटल्यास घटना दुरुस्तीकरून त्यांना ओबीसी कॅटेगिरी वगळून स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्यात यावे असे शेवटी म्हटले.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !