maharashtra day, workers day, shivshahi news,

मरवडे पंचक्रोशीतील हजारो महिलांनी अभिजीत पाटील यांना भाऊराया म्हणत बांधल्या राख्या

रोजगार निर्मितीच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावे,आपला भाऊ म्हणून कायम सोबत असेन - अभिजीत पाटील

Thousands of women from Marwade Panchkroshi tied rakhis to Abhijit Patil , mangalwedha , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील व मित्र परिवाराच्या वतीने मरवडे पंचायत समिती, गटातील  कविता पवार, सविता जाधव, निकीता पवार, सुनिता राठोड, सारिका केंगार, अर्चना चव्हाण, मोहीनी केंगार, लक्ष्मी सुतार, सुनिता सोनवणे, यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक महिलांनी कार्यक्रमाचे अयोजन केले होते. पंचक्रोशीतील सर्व महिलांच्या उपस्थित रक्षाबंधन सोहळा लतिफभाई मंगल कार्यालय, मरवडे येथे श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना हजारो महिलांनी राखी बांधल्या आहेत.


कार्यक्रमाच्या प्रसंगी महिलांनी, शालेय विद्यार्थ्यांनी, वयोवृध्द मतांनी अभिजित पाटील यांना राखी बांधून ओवाळणी केली. वयोेवृध्द मातांनी आबांना भरभरून शुभेच्छा आर्शीवाद दिले. या रक्षाबंधन सोहळयात मरवडे पंचायत समिती गणातील सर्व गावातून महिलांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती. चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने महिलांना भाऊरायांची साडी वाटप करण्यात आली.

यावेळी हजारो बहिणींचा बंधूराज म्हणून अभिजीत आबा पाटील म्हणाले की, महिलांनी आता उद्योजक व्हावे, यामध्ये शासनाकडूनही अनेक सुविधा उपलब्ध करून देऊ. रोजगार निर्मिती होण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून अनेक गट निर्माण करावे, आगरबत्ती सारखा व्यवसाय आपण करू शकता. 

तसेच शिलाई मशिनची आवड असणार्‍या महिलांसाठी श्री विठ्ठल कारखान्याच्या गारमेंटच्या वतीने सहकार्य करून ऑर्डर देऊन महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण नक्कीच होईल. रक्षाबंधनानिमित्त आपण संकल्प करूया, कुटूंबाला आधार देण्यासाठी, शेती,दुध व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून स्वतः उद्योजक होण्यासाठी पुढे या, आपला भाऊ या नात्याने येणार्‍या कोणत्याही अडचणीच्या काळात साथ देण्यासाठी कटीबध्द असेल असे बोलताना सांगितले.

यावेळी भाळवणी, डिकसळ, बालाजीनगर, मरवडे, कागस्ट, कात्राळ, कर्जाळ, फटेवाडी, हिवरगाव, हाजापूर, हिवरगाव, खोमनाळ, तळसंगी, भालेवाडी, डोणज, येड्राव  सिद्धकनेरी आदी पंचक्रोशीतील अनेक महिलांभगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या..
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !