मुख्यमंत्री कार्यलयाकडून शेतरस्त्यांच्या अर्जाची दखल घेत महसुल विभागाला कार्यवाहीच्या सुचना
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
सरकारने शेतरस्त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास सुपिक जमिन नापिक होतील असे शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे यांनी सांगितले आहे. पारनेरच्या शासकीय विश्रामगृहावर शेतकऱ्यांची विशेष आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
पारनेर तालुका हा सातत्याने शेतीसंदर्भात प्रश्न समोर येताना दिसत आहे भारत हा कृषिप्रधान देश असुन शेतकरी समृद्ध तर गाव समृद्ध तर राज्य, राष्ट्र समृद्ध या विचाराने राज्यात देशात भूमिका ठेवून कार्य होणे गरजेचे असताना सध्याच्या काळात शेतीला दुय्यम स्थान मिळू लागल्याने आज शेतकऱ्यांना वाली नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका हा विस्ताराने मोठा असुन पारनेर तालुक्याचे राष्ट्रहीतासाठी मोठे योगदान आहे याच तालुक्यात भविष्यात शेतीसाठी निर्माण होणारे धोके लक्षात घेवून शेतकऱ्यांनी एकत्र येत ब्रिटीशकालिन शेतरस्त्यांच्या प्रश्नावर सरकारचे शेतकरी चळवळीच्या माध्यमातून आंदोलन, जनजागृती करत प्रशाकणाचे लक्ष वेधन्याचे काम केले असून राज्यात अनेक शेतक-यांना शेतरस्त्यांच्या प्रश्नामुळे जमिनी गमवाव्या लागल्या असुन अनेक मोठमोठ्या फौजदारी स्वरूपाच्या घटना समोर येत असताना शिव पाणंद शेतरस्ता समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करत शेतकऱ्यांच्या व्यथा पत्राद्वारे कळविण्यात आल्या.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्राची दखल घेत महसुल विभागाला कार्यवाहीसाठी सुचना करण्यात आली असताना शेतरस्त्यांसदर्भातील विविध विषयांवर पारनेरच्या शासकीय विश्रामगृहावर शेतकऱ्यांची विशेष आढावा बैठक घेवून सरकारच्या कार्यवाहीवर अवलंबून न रहाता चळवळीच्या माध्यमातून फौजदारी स्वरूपाच्या घटना टाळण्यासाठी तालुक्यात गटगृपकमिटी स्थापन करून तालुक्यात शेतरस्ता तंटामुक्तीच काम करून आपापसात प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जाईल त्याचबरोबर प्रशासकीय, न्यायालयीन पातळीवरील समस्या निवारणासाठी वेळोवेळी मार्गदर्शन बैठक मेळावे घेवून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम चालु ठेवत शासण दरबारी पाठपुरावा चालु ठेवत लढा व्यापक करण्याचे यावेळी सर्वानुमते बैठकीत ठरविण्यात आले.
यावेळी भास्कर चेमटे, रामदास लोणकर, तुकाराम कावरे, आबासाहेब लंके, बाबाजी घोगरे, भाऊसाहेब वाळूंज, दशरथ वाळूंज, विठ्ठल शिंदे, हौशिराम कुदळे, सोमनाथ फटांगडे, धोंडीबा साबळे, नामदेव ज-हाड, विठ्ठल लोणकर, संजय साबळे, विठ्ठल साबळे आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शुन्य शेतरस्ताकेस अशी पारनेर तालुक्याची आळेख निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सर्वानुमते ठरले असुन त्यादृष्ठीने निस्वार्थ काम करणार असल्याचे शेतकर्यांनी एकजुटीने ठरवले असुन राज्यात शासण निर्णयाची अमलबजावणी करून तालुक्यासह राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व्यापक लढा उभारणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा