उपसरपंच दत्ता दिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
तालुक्यातील वाघुंडे बुद्रुक गावचे ग्रामपंचायत सदस्य सध्या उपसरपंच असणारे दत्ता दिवटे यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवत कार्यक्रम साजरा करण्यात आला. गावच्या विकासासाठी विकास कामांची मागणी ग्रामपंचायत ने आमदार नीलेश लंके यांच्याकडे केली होती आणि या गावातील विविध विकासकामांना आमदार निलेश लंके यांनी मंजुरी दिली होती.
त्यानिमित्त गावचे उपसरपंच दत्ता दिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचे भुमिपुजन तसेच लोकार्पण करण्यात आले.या वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुलांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त आमदार निलेश लंके यांच्यासह निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव तसेच वनकुटे गावचे लोकनियुक्त माजी सरपंच ऍड. राहुल झावरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीचा अहमदनगर जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे-दिवटे,
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, पारनेर तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुवर्णाताई धाडगे, ज्येष्ठ नेते शशिकांत आंधळे, दिपक पवार, गाडीलकर साहेब, शिवाजी जाधव, सरपंच भोगाडे सर, उमा बोरुडे, सरपंच रेश्मा पवार, आप्पासाहेब रसाळ, संदीप मगर, सतीश भालेकर, प्रसाद नवले, अजिंक्य गवळी, पळवे सरपंच भाऊ जाधव, प्रकाश गुंड, सरपंच शिवाजी शिंदे, संतोष तरटे, गोटू जगताप, किसन जासूद, अशोक जासुद, दादा शिंदे, अनिल गंधाक्ते, तसेच परिसरातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच दत्ता दिवटे यांना सर्व मान्यवरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उपसरपंच दत्ता दिवटे यांनी सर्वांचे आभार मानले.
दत्ता दिवटे यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा : आमदार निलेश लंके
सध्या गावागावात लोकांचे वाढदिवस साजरे होतात. या वाढदिवसासाठी ज्यावेळी आम्हास आमंत्रित केले जाते त्यावेळी कर्णकर्कश आवाजातील डीजे, बिर्याणी आदी गोष्टींवर भर दिला जातो ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु दत्ता दिवटे यांनी एक विधायक द्रुष्टिकोन ठेवुन गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहत लोकांच्या सार्वजनिक हिताची गोष्ट लक्षात घेऊन विकास कामांची मागणी केली होती. त्यानुसार मी गावच्या विकासासाठी सुमारे दोन कोटींच्या विकासकामांना या ठिकाणी मंजूरी मिळविली. दत्ता दिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे भुमिपुजन आणि काही कामांचे लोकार्पण करताना आनंद होत आहे. दत्ता दिवटे यांचा आदर्श तालुक्यातील इतर तरुणांनी घेऊन अशाच प्रकारे विधायक कामे करावीत असा मनोदय आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
आमदार निलेश लंके यांचे आमच्या गावावर विशेष प्रेम असून त्या प्रेमाच्या माध्यमातून गावामध्ये विकास कामे होत आहेत आणि आम्ही नक्कीच त्या प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर तरुणांच्या हातात ग्रामपंचायत आल्याने गावचा कायापालट झाला आणि गावच्या इतिहासामध्ये सर्वाधिक निधी गावाला मिळाला. आमदार साहेबांकडे पाहून काम करण्याची प्रेरणा मिळते.दत्ता दिवटे(युवा उपसरपंच वाघुंडे बुद्रुक ग्रामपंचायत)
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा