maharashtra day, workers day, shivshahi news,

रोजगारसेवक पदी सुनील उपासे, दिगंबर ताटे यांची निवड

पळसगाव आणि टाकळगाव साठी करणार काम

Selection of Sunil Upase, Digambar Tate as Rozgarsevak , nanded , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)

ग्रामपंचायत कार्यालय पळसगांव-टाकळगांव च्या वतीने 3 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती. या ग्रामसभेचा मुख्य विषय रोजगार सेवक निवडीचा होता. ही ग्रामसभा अध्यक्षांच्या परवानगीने चालू झाली. त्यानंतर गावकर्यांनी आपापले विचार मांडले. या अगोदरील रोजगार सेवकांनी त्यांनी नेमून दिलेली कामे नं केल्याचा ठपका ठेवण्यात आला व त्यांना नोटीस ही देण्यात आली होती मात्र त्यांनी नोटीसीला उत्तर नं दिल्यामुळे ग्रामपंचायतने त्यांना या पदावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. 


विशेष ग्रामसभेत गावातील अनेक नागरिकांनी हजेरी लावत आपली मते मांडली. रोजगार हमी योजना प्रभावी राबविण्यासाठी नवीन ग्राम रोजगार सेवकांची निवड करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी मांडले. त्यानंतर सुचकांनी नाव सुचवल्याप्रमाणे रोजगार सेवकांची निवड करण्यात आली. पळसगाव अन टाकळगाव या गट ग्रामपंचायत मध्ये नूतन रोजगार सेवक म्हणून पळसगाव साठी सुनील उपासे तर टाकळगाव साठी दिगंबर ताटे यांची निवड करण्यात आली.

      यावेळी सरपंच सौ.यशोदाबाई साहेबराव कांबळे, उपसरपंच  दत्ता गंगाधरराव शिंदे, ग्रामसेविका उषा गोरखवाड, माजी सरपंच शिवाजी शेषेराव शिंदे,प्रभाकर शिंदे,भास्कर ताटे, माधव पांचाळ, साहेबराव कांबळे, सदस्या सौ निर्मला शिंदे,सौ.प्रतिभा शिंदे, सौ.उषाताई गिरी,सौ.गऊबाई कांबळे,सौ.कमलबाई कांबळे संगणक परिचालक रामकृष्ण मोरे आदीं उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !