शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
पारनेर तालुक्यातील घाणेगाव येथील युवक मुकिंदा तात्या भाऊ शिंगोटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 39 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक भाऊ एक बहिण आई वडील असा मोठा परिवार आहे. सुपा येथील गणराज इस्पात कंपनी सुपा एमआयडीसी या ठिकाणी ते सिक्युरिटीचे काम करत होते. शेतामध्ये काम करताना सकाळी 11 :00 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने सुपा येथील खाजगी सिम्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू उपचारांपूर्वी झाल्याचे डॉ. नागपुरे यांनी सांगितले. त्यांच्या अचानक जाण्याने घाणेगाव पंचक्रोशीत तसेच नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. घाणेगाव येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावरती शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा