चेअरमन अभिजीत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
मंगळवेढ्याच्या विविध प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी दिले सविस्तर निवेदन
मंगळवेढा येथील ३५ गावातील उपसासिंचन योजनेबाबत त्रुटी पूर्ण करून भरघोस निधी उपलब्ध करण्याबाबत बैठक घेण्याची विनंती करणारे निवेदन विठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजित पाटील यांनी मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांना शुक्रवार दिनांक १५सप्टेंबर रोजी वर्षा बंगला, मुंबई येथे सादर केले व महत्त्वपूर्ण विषयांवर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादीचे नेते श्री.अभिजीत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री यांना भेटून संवाद साधला.
पंढरपूर - मंगळवेढा - सोलापूर जिल्हात पाऊस खुप कमी पडल्यामुळे दुष्काळ जाहीर करुन जनावरांसाठी चारा डेपो सुरु करावा, उजनी व वीर धरणातून नदी व कॅनल साठी पाणी सोडावी, वीज खंडीत करु नये, पिकांना व पर्यायाने शेतकऱ्यांना जीवनदान देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणेबाबत निवेदन सादर केले.
अनेक वर्षांपासून मंगळवेढातील ३५ गावांपैकी २४ गावांची उपसासिंचन योजना अंतिम टप्प्यात आहे. तरी उर्वरित गावे तांत्रिक बाबींमुळे शासनाच्या लाल फितीत अडकल्या आहेत. त्या योजनातील त्रुटी पूर्ण करण्यात याव्यात व मुबलक निधी मंजूर करावा असे निवेदन यावेळी अभिजित पाटील यांनी दिले.
संतभूमी मंगळवेढ्यात महात्मा संत बसवेश्वर स्मारकासाठी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अर्थसंकल्पात स्मारकाची घोषणा केली होती. परंतू अद्याप स्मारकास निधी उपलब्ध झालेला नाही. त्याबाबत निधी उपलब्ध करून तातडीने कामास सुरुवात करावी अशी विनंती देखील या निमित्ताने केली पाटील यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा