maharashtra day, workers day, shivshahi news,

चंद्रयान तीन यशस्वी झाल्याने नायगाव शहरामध्ये उत्सव

फटाके वाजवून पेढे वाटून केला आनंद साजरा
Celebrations in Naigaon as Chandrayaan 3 succeeds, Celebrated by bursting firecrackers and distributing pedhas, naigao, aded, india, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर)
नायगाव दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता चांद्रयान तीन भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्न, अचुक अंदाज, आत्मविश्वास, सांघिक प्रयत्न यांचे साकार स्वरुप चांद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवणे या अभिमानास्पद कामगिरी बद्दल प्रशंसासाठी शब्द कमी पडतात. अपयशाने रडणाऱ्या शास्त्रज्ञाना खचू नका मी तुमच्या पाठीशी आहे असा सल्ला देत गळाभेट करून धीर देणारे प्रधानमंत्री, सरकार आणि ISRO चे सर्व वैज्ञानिक व त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन 
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत जगातील पहिला देश ठरला चांद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग झाल्याबद्दल इस्रो च्या सर्व वैज्ञानिकांचे हार्दिक अभिनंदन व्यक्त करून आनंद उत्सव नायगाव शहरांमध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने नायगाव शहरांमध्ये  फटाके वाजवून पेढे भरवत भारत माता की जय वंदे मातरम अशे नारे देत नायगाव शहर डॉ. हेडगेवार चौक या ठिकाणी मोठ्या आनंदाने जल्लोष साजरा करण्यात आला. 
या आनंदप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक तथा सामाजिक कार्यकर्ते भाऊराव पा. चव्हाण, गंगाधरजी माऊली सर, पोलीस पाटील नायगाव तालुका अध्यक्ष भागवत पा.भुताळे, अशोक पा.पवार प्रवीण बिरेवार, शंकर वडपत्रे,गणेश पा.देगावे संभाजी पोटफोडे,किरण पा.मोरे,विठ्ठल बोरीकर,शेरोसिंग टाक, कैलास वाघमारे,संजय गायकवाड, कृष्णा चौधरी,श्रीनिवास देगावे, शिवाजी पा.चव्हाण,गंगाधर गोस्केवार  आदी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !