maharashtra day, workers day, shivshahi news,

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त होटाळा येथे सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम

बहुजन बांधवांनी लाभ घ्यावा - कोतेवार बंधुंचे आवाहन
Satyapal Maharaj Social Awareness Programme, lokshahir Annabhau Sathe Jayanti, naigaon, nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुरकर)
सर्वसामान्य माणसाचे प्रश्न व समस्या काय आहेत यासह समाज अंधश्रद्धा व व्यसनातून मुक्त कसा झाला पाहिजे या विषयावर राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त दिनांक 27 ऑगस्ट रोजी तालुक्यातील मौजे होटाळा येथे सायंकाळी आठ वाजता होणार असून या कार्यक्रमाचा सर्व बहुजन बांधवांनी लाभ घ्यावा असे नम्र आवाहन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष गंगाधर कोतेवार आयोजक माणिक कोतेवार व अध्यक्ष रमेश कोतेवार यांनी केले आहे.
दिनांक 27 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी ठीक दहा वाजता होटाळा येथील सरपंच गणेश पाटील पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून सायंकाळी सहा वाजता सकल मातंग समाज समन्वयक मारुती वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर तर प्रमुख पाहुणे युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यासह भास्कर पाटील भिलवंडे, 
नारायण गायकवाड, पंढरीनाथ भालेराव, प्रीतम गवाले, मामा गायकवाड, मुकुंदर कुडके, राहुल गायकवाड, पत्रकार माधव बैलकवाड यांची उपस्थिती राहणार आहे. तर या भरगच्च कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे नम्र आवाहन सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ पदाधिकारी यांनी केले आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !