maharashtra day, workers day, shivshahi news,

श्री विठ्ठल प्रशालेत ध्वजारोहण समारंभ संपन्न

गरीब आणि होतकरू विद्याथ्यांना गणवेश वाटप

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
वेणुनगर श्री विठ्ठल प्रशाला व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे संचालक मा.श्री. धनंजय उत्तम काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रशालेचे प्राचार्य मा. श्री. व्ही.जी.नागटिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहण्यांचे स्वागत केले.

 


या प्रसंगी बोलताना श्री विठ्ठल सह. सा. कारखान्याचे संचालक प्रा.तुकाराम मस्के म्हणाले की; १५ ऑगस्ट १९४७ या दिवसी ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून भारतमाता मुक्त झाली तो हा दिवस. स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी अनेक वीरजवानांनी प्राणाचे बलिदान दिले. आज स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना इतिहासात पाठीमागे वळून पाहिले असता आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात अनेक आघाडीवर दैदिप्यमान प्रगती केलेली आहे. आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि प्रगतिचा नावलौकीक टिकविण्यासाठी तुम्ही विद्यार्थीनी स्वच्छतेचा व पर्यावरण सुरक्षीत राखण्याचा संदेश घरोघरी पोहचवण्याचे व भ्रष्टाचार मुक्त बलशाली भारत घडवायचा असेल तर प्रत्येक विद्याध्याने आणि भारतीयांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास या देशाचे स्वातंत्र्य आबादित राहील त्यासाठी दृढनिर्धार आणि एक जूटीचीच गरज आहे. आजचा आदर्श विद्यार्थी हा भावी राष्ट्राचा आदर्श नागरिक व्हावा यासाठी आपण सर्वांनी स्वातंत्र देशाचे नागरिक असल्याचं अभिमान बाळगावा असे म्हणाले.
या प्रसंगी गरीब आणि होतकरू विद्याथ्यांना पाहुण्यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. तसेच विद्याध्यांनी देशभक्तीपर गीते पारंपारीक नृत्य, लेझीम दांडपटा चालविणे यासारखे कार्यक्रम सादर केले.

यावेळी श्री विठ्ठल सह. सा. कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.सौ. प्रेमलता रोंगे, कारखान्याचे संचालक, प्रा.तुकाराम मस्के .मा. श्री. प्रविण कोळेकर, मा. श्री. सुरेश भुसे. मा. श्री. जनक भोसले, मा. श्री. संभाजी भोसले. मा. श्री. ताय्यापा गवळी, मा.श्री.सचिन खटके. मा. श्री. नवनाथ नाईकनवरे व कार्यकारी संचालक मा.श्री.डी. आर. गायकवाड यांच्यासह प्राचार्य श्री. व्ही. जी. नागटिळक, पर्यवेक्षक श्री. डोंगरे आर. एन. कारखान्याचे अधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, कामगार, शेतकरी, पालक व विद्यार्थीी मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.श्री चव्हाण एस.बी. यांनी केले तर प्रा श्री सट्टे डी.व्ही.यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !