सत्कारमूर्तीचा सोन्याची अंगठी घालून सत्कार करण्यात आला
शिवशाही वृत्तसेवा , नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील येथिल शांती निकेतन हायस्कूल केंद्रस्तरीय शिक्षण परिषद भरविण्यात आले .या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. रुपेशजी देशमुख कुंटूरकर माजी सरपंच व चेअरमन हे होते.
कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती मा. सुरेश पाटील सर शिक्षण विस्तार अधिकारी हे होते त्यांचा व त्यांच्या सौभाग्यवतींचा सत्कार सूजलेगाव केंद्रामधील येणाऱ्या सर्व शाळांच्या वतीने रुपेश देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार शाल व अंगभर आहेर हाताला सोन्याची अंगठी घालून अशा स्वरूपात सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुंटूर येथील तंटामुक्ती अध्यक्ष व मुंडे सर जिल्हा परिषद शाळा कुंटूर व सुजलेगाव गाव केंद्रामध्ये येणाऱ्या 25 गावचे शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाला येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत दी ओवाशीस इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पत संचालन करून स्वागत केले. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा