जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे यांच्याकडून नियुक्तीपत्र
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
नुकतीच भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेची बैठक झाली. त्यामध्ये अनिल पठारे यांची भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे यांच्याकडून पठारे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
तसेच भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशाने प्रकाश खैरमोडे यांनी अनिल पठारे यांची नियुक्ती करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. अनिल पठारे यांना नियुक्तीपत्र हे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश कुलथे यांच्या हस्ते देण्यात आले त्यांना नियुक्तीपत्र देताना भीम आर्मी एकता मिशनचे पारनेर तालुका अध्यक्ष संजय भाऊ सोनवणे व इतर मित्र परिवार मोठ्या संख्येने हजर होता.त्यांची जिल्हा कार्य अध्यक्ष पदावर निवड झाल्यामुळे विविध माध्यमातून त्यांचे हार्दिक स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा