मंगळवेढा तालुक्यात अभिजीत पाटील यांनी वाढवला जनसंपर्क
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचा सध्या मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावोगावी खेडोपाडी जाऊन भेटीगाठी व लोकसंपर्क करत असताना दिसत आहेत.
आज दिनांक २९जुलै रोजी हिंदू-मुस्लीमाचा पवित्र असणारा मोहरम सणानिमित्त खूपसुंगी येथे श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी भेट दिली असता गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात जेसीबीतून पुष्पवृष्टी करून व हलगीच्या जल्लोषात अभिजीत पाटलांचे स्वागत केले.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अभिजीत पाटील हे मोठ्या लोकसंपर्कात असून गावोगावी कार्यक्रमात प्रत्येकाच्या सुखदुःखात पाटील हे उपस्थित राहत असताना दिसत आहेत... येत्या विधानसभेच्या तयारीत पाटील यांनी चांगलीच तयारीत असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा