दारू पिण्यास पैसे न दिल्याने साल्यानेच मेव्हण्याचा खून केला
शिवशाही वृत्तसेवा, प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे संभाजी नगर, कन्नड
मयताची पत्नी कल्पनाने आरडाओरडा करताच काही नातेवाईक जमा झाली त्यांनी हे प्रकरण येथील सरपंच नारायण सोनवणे व लक्ष्मण सोनवणे यांना कळविले त्यांनी लगेच ही माहिती पोलिसांना कळवताच पोलीस घटनास्थळी हजर झाले प्राथमिक आरोग्य केंद्र करंजखेड येथे रंजीत माळी यांचे स्वच्छदन करण्यात आले.दारू पिण्यास पैसे दिले नाही. म्हणून झालेल्या वादात एक किस्मानी आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा खून केल्याची घटना सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान तपोवन येथे घडली यातील मयताचे नाव रंजीत अंकुश माळी वय 45 राहणार घुसुर हल्ली मुक्काम तपोवन असे असून घटनेनंतर आरोपी गौताळा चांगलाच फरार झाला आहे तपोवन येथील कल्पना बाबू गायकवाड यांचा घुसुर येथील रणजीत अंकुश माळी यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता.
लग्नानंतर अंकुश माळी हा मजुरीसाठी सासरवाडीतच म्हणजे तपोवन तालुका कन्नड येथे आपल्या पत्नी व दोन मुलासह पाच-सहा महिन्यांपासून सासऱ्याच्या झोपडी शेजारीच दुसरी झोपडी बांधून राहत होता घटनेच्या दिवशी तपोवन येथे किराणा सामान आणण्यासाठी गेलेला साला व मेव्हणा यांच्यात दारू पिण्यास पैसे देण्याहून वादावादी झाली कर्दळी जंगल पायथ्याशी असलेल्या झोपडीवर येतात मेव्हण्याने आपली पत्नी कल्पनाविला तुझा भाऊ नंदू याला दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून तो माझ्यासोबत भांडला अशी माहिती दिली ही बाब नंदनी ऐकल्यानंतर पुन्हा त्यांच्यात चांगलाच वाद होऊन हाणामारी झाली व साल्याने झोपडीच्या कुडातून कुराड काढून रंजीत माळी यांच्या गळ्यावर सपासप दोन वार करून फार केले.
मेहुणा मयत झाल्याचे समजताच साल्याने तेथून गवताळा जंगलातून पळ काढला नंदू बाबू गायकवाड वय 35 राहणार तपोवन असे आरोपीचे नाव आहे याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपने कोमल शिंदे यांच्या मार्गदर्शक खाली उपनिरीक्षक सतीश बडे विलास सोनवणे पंढरी इंगळे सोपान टकले लालचंद्र नागलोत पवार कौतिक सपकाळ विजय बोटकर चव्हाण पवन खंबाट दीपक सोनवणे अधिक तपास करीत आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा