अवैधरित्या मुरूम घेऊन जाणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी
शिवशाही वृत्तसेवा , जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर.
नायगाव तहसील कार्यालयाचे वादग्रस्त तहसीलदार गजानन शिंदे यांनी रेती माफिया मुरूम माफिया माती मापिया यांना फार मोठे पाठबळ दिले असताना रेती मुरूम माती उत्खनन करणाऱ्यांना जोर पोहोचला होता, म्हणून अवैधरित्या मुरूम चोरी करून घेऊन जाणाऱ्या दोन हायवा पकडून पोलीस ठाण्यांनी कारवाई केली आहे.
नरसी येथील मुखेड रोडवर कांडाळा पाटीजवळ हायवा गाडी क्रमांक एम एच 0 सहा ये ओ 75 15 आणि एम एच 43 वाय 48 41 या दोन हायवाने अवैधरित्या मुरूम चोरी करून घेऊन जात असताना राम तीर्थ पोलीस ठाण्यांनी दोन्हीही हायवा गाड्या ताब्यात घेऊन सदर गाड्यांचा पंचनामा करून कारवाई केली करून तहसील कार्यालयातील महसूल विभागाकडे गाड्या जप्त करण्यात आलेले आहे, कारवाई कोणत्या स्वरूपाची झालेली आहे अद्याप समजू शकले नाही.
नूतन तहसीलदार मंजुषा भगत यांनी अवैधरित्या चोरी करणाऱ्या मुरूम रेती माफियावर कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा